परभणी : तपासी अंमलदारांचा सन्मानपत्राने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:41 IST2019-06-08T22:39:51+5:302019-06-08T22:41:22+5:30
गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ट पद्धतीने करून दोष सिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस दलातील तपासी अंमलदारांचा ७ जून रोजी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला़

परभणी : तपासी अंमलदारांचा सन्मानपत्राने गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ट पद्धतीने करून दोष सिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस दलातील तपासी अंमलदारांचा ७ जून रोजी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला़
शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्ह्यांसंदर्भात बैठक पार पडली़ या बैठकीत गुन्ह्यांचे तपास उत्कृष्ट पद्धतीने करून मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणे व दोषसिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाºया तपासी अंमलदारांचा पोलीस अधीक्षकांनी गौरव केला़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाण्यांचे प्रभारी उपस्थित होते़
या बैठकीत ए़आय़ इनामदार, एस़एम़ आचार्य, यु़एच़ शेख, सूर्यवंशी, डी़व्ही़ मुंडे, वड, सपोनि सुनिल पुंगळे, ए़ए़ शेख, एसक़े़ शेख, एऩए़ शेख, यु़एच़ शेख, जी़एम़ फड, पोलीस उपनिरीक्षक एऩएच़ तुकडे, पोलीस निरीक्षक आऱएऩ स्वामी, एऩयू़ राठोड, एम़एल़ आडे, सहाय्यक उपनिरीक्षक पवार, आऱव्ही़ सरोदे, सहाय्यक उपनिरीक्षक आय़यु़ शेख, एऩपी़ मुंडे, व्ही़एस़ बिलापट्टे या पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले़