परभणी : औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:58 IST2019-10-15T23:58:22+5:302019-10-15T23:58:32+5:30
औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील गीते पिंप्री गावाजवळील पुलावर एक कंटेनर आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती़ ही घटना १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास घडली़

परभणी : औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा (परभणी) : औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील गीते पिंप्री गावाजवळील पुलावर एक कंटेनर आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती़ ही घटना १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास घडली़
नांदेडहून जालन्याकडे जाणारा कंटेनर (क्रमांक आरजे ४९ जीए-०६५५) १४ आॅक्टोबर रोजी रात्री ११़४५ वाजेच्या सुमारास गीते पिंप्री गावाजवळील पुलावर आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला़ त्यामुळे हा कंटेनर पुलाच्या कठड्याला आदळून रस्त्यावर मधोमध आडवा झाला़ या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही़ मात्र कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे़
अपघाताची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी राऊत, महामार्गचे सहायक पोलीस निरीक्षक बिभीषण राठोड, अशोक धस, विजय बायस हे घटनास्थळी दाखल झाले़ अपघातग्रस्त कंटेनर पुलाच्या मध्ये अडकल्याने या मार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प झाली होती़ पोलिसांच्या तत्परतेने ही वाहतूक सुरळीत करण्यात आली़ या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़