परभणीत गोदामाला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:01 IST2018-04-16T01:01:27+5:302018-04-16T01:01:27+5:30
शहरातील वसमत रस्त्यावरील आहुजा कॉम्प्लेक्समधील एका गोदामाला आग लागल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या आगीत गोदामातील काही गाड्या, हेल्मेटचे नुकसान झाले असून, कॉम्प्लेक्समधील लाईटची वायरिंग जळून गेली आहे.

परभणीत गोदामाला लागली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील वसमत रस्त्यावरील आहुजा कॉम्प्लेक्समधील एका गोदामाला आग लागल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या आगीत गोदामातील काही गाड्या, हेल्मेटचे नुकसान झाले असून, कॉम्प्लेक्समधील लाईटची वायरिंग जळून गेली आहे.
येथील आहुजा कॉम्प्लेक्समध्ये राजेश खैराजानी यांचे आशापुरा मोटर्सचे गोदाम आहे. या गोदामात विक्रीसाठी आलेल्या नवीन गाड्या व हेल्मेट ठेवलेले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास अचानक गोदामातून धुराचे लोट बाहेर पडले. काही वेळातच आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निमशन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. या घटनेत गोदामातील दोन- तीन गाड्या, काही हेल्मटे जळाले आहेत. तसेच आगीमुळे लाईटची वायरिंग व एक मीटरही जळाले.