परभणी :जोरदार पावसामुळे पूल उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:50 IST2019-10-20T23:50:39+5:302019-10-20T23:50:43+5:30
परभणी शहर व परिसरात शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील असोला येथील नदीवरील रस्ता वाहून गेला आहे.

परभणी :जोरदार पावसामुळे पूल उखडला
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहर व परिसरात शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील असोला येथील नदीवरील रस्ता वाहून गेला आहे.
शनिवारी रात्री जिल्हाभरात जोरदार पावसाने हजेरी लावली. परभणी शहर व परिसरात रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. दोन ते अडीच तास जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शहरासह परिसरात पाणीच पाणी झाले.
या पावसाळ्यातील हा पहिलाच मुसळधार पाऊस ठरला आहे. दरम्यान, या पावसामुळे तालुक्यातील असोला परिसरातील नदीवरील रस्ता खचला आहे. पुराच्या पाण्याने रस्त्याची एक बाजू वाहून गेल्याने वाहतूक ठप्प पडली आहे.