शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

परभणी : गंगाखेड शहर आंदोलनांनी दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:35 AM

तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी, संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांसाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्यांंसाठी शेतकरी, निराधार वृद्ध व झोपडपट्टीधारकांनी २४ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून घेराव आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी)  : तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी, संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांसाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्यांंसाठी शेतकरी, निराधार वृद्ध व झोपडपट्टीधारकांनी २४ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून घेराव आंदोलन केले.दरमहा दिल्या जाणाºया ६०० रुपये मानधनात वाढ करीत निराधार लाभार्थ्यांना ५ हजार रुपयांचे मानधन देण्यात यावे, वेळेवर मानधन देण्यात यावे, दुष्काळी परिस्थितीत अडकलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोदाकाठावरील बालाजी मंदिर येथून निघालेला निराधारांचा धडक मोर्चा मराठा चित्र मंदिर, सराफा लाईन, भगवती चौक, दिलकश चौक, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, पोलीस ठाणे मार्गे तहसील कार्यालयावर धडकला.या मोर्चात लक्ष्मणराव गोळेगावकर, गोपीनाथ भोसले, कॉ. राजन क्षीरसागर, बाबूराव गळाकाटू, माणिकराव पवार, श्रीकांत भोसले, शेख युनूस, ओंकार पवार, गंगाधर जाधव, गोपीनाथ चव्हाण आदींसह शेकडो निराधार लाभार्थी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेराव४गंगाखेड- तालुक्यातील तीन मंडळात दुष्काळ जाहीर करून दोन महिने उलटले तरीही सरकारकडून तालुक्यात कुठल्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, वीज बिल माफ करावे, पीक विमा द्यावा, शेतकºयांच्या पीक कर्र्जाचे पूनर्गठण करून शेतकºयांना कर्जमुक्त करावे, गंगाखेड ते मसला ग्रामसडक योजनेतील रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्यात आले.४यावेळी माणिक कदम, भगवान शिंदे, माऊली लंगोटे, किशोर ढगे, केशव आरमळ, भास्कर खटींग, लक्ष्मण चाफळे, नाथराव दरेकर, माधव मांगीर, गणेश चाफळे, दिगंबर पवार, माधव कºहाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.गंगाखेडात झोपडपट्टीधारकांचे उपोषणगंगाखेड- शहरातील शासकीय जागेवरील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करावे, या मागणीसाठी शहरातील झोपडपट्टीधारकांनी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मस्के,राजेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.नगरपालिकेच्या हद्दीत शहरातील गौतमनगर, फुलेनगर, राजीव गांधीनगर, तुळजाभवानी नगर, अण्णाभाऊ साठेनगर, रमजाननगर, तारू मोहल्ला, रमाबाईनगर, आझादनगर, इंदिरानगर, लहुजीनगर, इदगाहनगर, ममता कॉलनी, नगरपालिका वसाहत या भागातील शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण नियमानुकूल करावे, १७ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून झोपडपट्टीधारकांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्यावा, या मागणीसाठी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मस्के, राजेंद्र निंबाळकर, नगरसेवक सत्यपाल साळवे, देवराव जंगले, प्रा. जयपाल पंडीत, लालू जाधव, सय्यद इरफान, सुनिल साळवे, शेख नजीर, राजरत्न साबणे, शेख नय्युम, पंचशीलाबाई पवार, शेख चॉंद, शीलाबाई सावंत, मालनबाई ढेरे, स्वप्नील कांबळे यांच्यासह शहरातील शेकडो झोपडपट्टीधारकांंनी २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून तहसील कार्र्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यानंतर नगररचना अभियंता यांच्यामार्फत ३० दिवसांत सर्वेक्षणाचे प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांनी उपोषणार्थींना दिले. त्यानंतर तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली.सेलू येथे दबाव गटाचे उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी २४ डिसेंबर रोजी दबाव गटाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.तालुक्यातील रस्त्यांची दुरुवस्था झाली आहे. नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सेलू- परभणी, सेलू- पाथरी, सेलू- देऊळगाव फाटा या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुुळे अनेक वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागला. त्यामुळे नादुरुस्त रस्त्यांची दुुरुस्ती करण्यात यावी. त्याच बरोबर दुधना नदीवरील उभारलेला नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, सेलू रेल्वेस्थानक ते रायगड कॉर्नर रस्त्यावर दुभाजक व विद्युत दिवे बसविण्यात यावेत आदी मागण्यांसाठी दबाव गटाच्या वतीने सोमवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. त्यानंतर शाखा अभियंता बळीराम माने यांनी उपोषणकर्त्यांचे निवेदन स्वीकारून मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. निवेदनावर श्रीकांत वाईकर, टी.ए. चव्हाण, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, रहीमभाई, गंगाधर चव्हाण, रामचंद्र कांबळे, गणेश थोेरे, सुरेंंद्र तोष्णीवाल, सोनू शेवाळे, भगवान पवार आदींच्या स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरी