परभणी : रोडे खून प्रकरणात चौथ्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:54 IST2019-04-07T22:54:40+5:302019-04-07T22:54:58+5:30
येथील नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीस अटक केली असून या प्रकरणात आता अटक केलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.

परभणी : रोडे खून प्रकरणात चौथ्या आरोपीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीस अटक केली असून या प्रकरणात आता अटक केलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.
शहरातील जायकवाडी परिसरात ३१ मार्च रोजी शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाला होता. घटनेनंतर किरण डाके व रवि गायकवाड हे दोन आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी १ एप्रिल रोजी या दोघांनाही न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याच प्रकरणात पोलिसांनी मीनाक्षी गायकवाड या महिला आरोपीस अटक केली. त्यानंतर प्रकरणाचा तपास करीत असताना ६ एप्रिल रोजी रात्री सुभाष पवार या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून आरोपीस सुभाष पवार यास न्यायालयासमोर उभे केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.