परभणी : वेगवेगळ्या प्रकरणांतील चार फरार आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:18 IST2018-10-07T00:18:16+5:302018-10-07T00:18:51+5:30
पोटगी प्रकरणासह इतर वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे़

परभणी : वेगवेगळ्या प्रकरणांतील चार फरार आरोपी ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोटगी प्रकरणासह इतर वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या चार आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे़
पाथरी तालुक्यातील कानसूर तांडा येथील आरोपी साहेबराव गुणाजी पवार हा पोटगी वॉरंट प्रकरणामध्ये हवा होता़ पोलिसांनी ६ आॅक्टोबर रोजी त्यास कानसूर शेत शिवारातून ताब्यात घेतले़ त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले़ तसेच पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या एका गुन्ह्यात आरोपी शंकर विष्णू पवार (रा़ पाथरी) हा दोन वर्षांपासून फरार होता़ या आरोपीलाही पोलिसांनी पाथरी तालुक्यातील वाघाळा येथून ताब्यात घेतले असून, त्यास पालम पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़ चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या सुनील भिकाजी कांबळे यास तहसील कार्यालय पाथरी परिसरातून पोलिसांनी अटक केली़ त्याच प्रमाणे दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या राहुल गौतम गाडे यास पोलिसांनी ६ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे़ या चारही आरोपींना त्या त्या पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़ ही कामगिरी स्थानिक गुन्हा अन्वषेण शाखेच्या पथकाने केली़