परभणी : जलतरणिका परिसरातील बगिचा फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:06 IST2018-01-16T00:06:20+5:302018-01-16T00:06:33+5:30
परभणी : येथील जलतरणिका परिसरात तन-मन-धन मेन्स वेअर या प्रतिष्ठानासमोरील बगीचा येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधत आहे. या बगीच्यातील क्रीपिंग लॅन्टीना ही झाडे शेकडो फुलांनी लगडली आहेत. या फुलांवरील फुलपाखरांचा मुक्तस् ांचार आणि रंगीबेरंगी फुलांमुळे वातावरण आल्हाददायक बनले आहे.

परभणी : जलतरणिका परिसरातील बगिचा फुलला
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जलतरणिका परिसरात तन-मन-धन मेन्स वेअर या प्रतिष्ठानासमोरील बगीचा येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधत आहे. या बगीच्यातील क्रीपिंग लॅन्टीना ही झाडे शेकडो फुलांनी लगडली आहेत. या फुलांवरील फुलपाखरांचा मुक्तस् ांचार आणि रंगीबेरंगी फुलांमुळे वातावरण आल्हाददायक बनले आहे.
मागील २५ वर्षांपासून हा बगीचा तयार केला आहे. दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करीत झाडांची आणि लॉनची रचना केली जाते. नंदूसेठ तापडिया यांनी सुबकतेने हा बगिचा निर्माण केला असून क्रीपिंग लॅन्टीना ही झाडे लावली आहेत. क्रीपिंग लॅन्टीना हे झाड लॅन्डस्केपींगसाठी वापरले जाते. बारा महिने फुलांनी लगडलेली ही झाडे बगिच्याच्या आकर्षणात भर घालतात. विशेष म्हणजे, कमी पाणी आणि खडसर जमिनीतही झाडांची वाढ जोमाने होत असल्याने बगीच्याच्या सजावटीत या झाडाला विशेष महत्त्व आहे. महिनाभरापासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने झाडे फुलांनी लगडली आहेत. जांभळ्या आणि पांढºया रंगाच्या फुलांची जणू गोफणच झाली असून, फुलपाखरेही आकर्षित होत आहेत. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास अल्हाददायक वातावरण निर्माण होत आहे.