शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

परभणी: मटका घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:08 PM

कल्याण-मुंबई नावाचा मटका जुगार घेणाºया पाच जणांवर ५ जुलै रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह १० हजार ८२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : कल्याण-मुंबई नावाचा मटका जुगार घेणाºया पाच जणांवर ५ जुलै रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह १० हजार ८२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.गंगाखेड शहरातील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास फिरत असलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला एक जण मोबाईल व्हॅटस्अ‍ॅपवर कल्याण नावाचा मटका घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने शहरातील मोंढा परिसरातील एका व्यापारी संकुलनासमोर उभ्या असलेल्या बालाजी बापूराव राठोड (वय २८, रा. गोदावरी तांडा) यास पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळील मोबाईलच्या व्हॅटस्अ‍ॅपवर कल्याण नावाच्या मटक्याच्या आकडे लावलेल्या चिठ्या व रोख ४३० रुपये मिळवून आले. त्याच्या जवळील ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ३ हजार ४३० रुपयांचा ऐवज जप्त करून कोणासाठी मटका घेतो, अशी विचारणा केली. तेव्हा परभणी तालुक्यातील साळापुरी येथील राठोड यांच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचे सांगितले. त्यावरून जमादार शंकर मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी राठोड व देवा राठोड यांच्या विरुद्ध जुगार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार रंगनाथ देवकर हे करीत आहेत. तसेच गंगाखेड पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाचे कर्मचारी अण्णा मानेबोईनवाड यांनी सायंकाळी ७ च्या सुमारास जिल्हा बँक शाखेसमोरील पानटपरीवर धाड टाकून जितेंद्र इचके, कल्याणीअप्पा, भारत जाधव (रा. सर्व गंगाखेड) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील रोख २ हजार ३९० रुपये, ५ हजारांचा मोबाईल, मटका, जुगाराचे साहित्य असा एकूण ७ हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी