परभणी : मानव विकासच्या बसमध्ये आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:48 IST2019-02-25T00:48:29+5:302019-02-25T00:48:40+5:30
जिंतूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर मानव विकासच्या बसमधील इंजिनमध्ये आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

परभणी : मानव विकासच्या बसमध्ये आग
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिंतूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर मानव विकासच्या बसमधील इंजिनमध्ये आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
जिंतूर ते कवडा आणि कवडा ते परभणी या मार्गावर प्रवास करणारी एम.एच.०६ -एस.८५६९ या क्रमांकाची बस रविवारी परभणी येथून प्रवासी घेऊन जिंतूरकडे येत होती. या बसमध्ये ५७ प्रवासी होते. मात्र वाटेतच ही बस बंद पडल्याने वाहक आणि चालकाने काही प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर ही बस हळूहळू जिंतूर शहरातून जात असताना तहसील कार्यालयासमोर बसच्या इंजिनने पेट घेतला. ही माहिती अग्नीशमन दलाला मिळाल्यानंतर अग्नीशमनच्या कर्मचाºयांनी आग विझविली. दरम्यान, या घटनेत कोणतीही हानी झाली नाही.