परभणी :सोनपेठमध्ये अग्निशमन गाडीवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:58 IST2018-07-25T00:57:31+5:302018-07-25T00:58:00+5:30
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला सोनपेठ शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ सोनपेठ नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या गाडीवर शिवाजी चौकात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा अपवाद वगळता बंद शांतेत पार पडला़

परभणी :सोनपेठमध्ये अग्निशमन गाडीवर दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला सोनपेठ शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ सोनपेठ नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या गाडीवर शिवाजी चौकात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा अपवाद वगळता बंद शांतेत पार पडला़ सकाळपासूनच व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती़ शाळा, महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली़ दिवसभरात शहरात एकही बस दाखल झाली नाही़ सकाळी १० वाजेच्या सुमारास शिवाजी चौक येथे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली़ यावेळी एक मराठा लाख मराठा यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला़ मुंजाभाऊ तेलभरे चौक, टिपू सुलतान चौक, आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौकमार्गे मोर्चा शिवाजी चौकात आला़ तहसीलदार जीवराज डापकर यांनी निवेदन स्वीकारले़ यावेळी काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, मेगा भरती बंद करावी, आदी मागण्या करण्यात आल्या़