शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

परभणी : खिळखिळ्या बसमधून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:52 AM

या आगारातील मोडकळीस येऊन खिळखिळ्या झालेल्या जुनाट बसमधून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन गंगाखेड आगाराला नवीन बस देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : या आगारातील मोडकळीस येऊन खिळखिळ्या झालेल्या जुनाट बसमधून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन गंगाखेड आगाराला नवीन बस देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.सुरक्षित समजल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याचे चित्र गंगाखेड आगारातील बसमधून प्रवास करताना दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका व संतांची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या गंगाखेड आगारातून दररोज २ शिवशाही व इतर ५६ बस अशा एकूण ५८ बसमधून मुंबई, पुणे, शेगाव, नाशिक, बुलडाणा, औरंगाबाद आदी लांबपल्यासह प्रवाशांच्या इच्छुक स्थळी ने-आण केल्या जात आहे. यातील २ शिवशाही बस वल्लभनगर, ४ एशीयाड बस, मुंंबई व नाशिक मार्गावर तर परिवर्तन लालपरी बस पुणे, औरंगाबाद, बुलडाणा, शेगाव मार्गावर धावत आहेत.गंगाखेड, पालम व सोनपेठ या तीन तालुक्यांसाठी मिळालेल्या १९ मानव विकासच्या बस तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावर तसेच लातूर, परभणी, नांदेड मार्गावर धावत आहेत. गंगाखेड आगारात असलेल्या बस इतर आगारातील रस्त्यावर चालवून नंतर या आगारात आल्याने या बसची दुरवस्था झाली आहे.यातील काही परिवर्तन लालपरी बसच्या खिडक्यांची तावदाने निखळून पडले, आसन तुटले आहेत. तर काही बसच्या टपावरील बाजूने लावलेला पत्रा कापला गेल्याने खिळखिळ्या झालेल्या या बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत.बसची झालेली दुरवस्था पाहून मोडकळीस आलेल्या बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांचा जीव खालीवरी होत असून प्रवाशांच्या नजरा एकटक फाटलेल्या पत्र्यावर राहत आहेत. आपले स्थानक कधी येईल आणि आपण बसमधून इच्छुक स्थळी कसे सुरक्षित पोहचू हा विचार व भिती प्रवाशांच्या मनात घोळत आहे. इच्छुक स्थळी स्थानकात बस पोहचताच मोठ्या संकटातून सुटका झाल्यासारखे प्रवासी घाईगडबडीत बसमधून उतरताना दिसत आहेत.गंगाखेड आगारातील बसेसची दुरवस्था झाल्याने व गेल्या चार वर्षांपासून दोन शिवशाही बस वगळता नवीन एकही बस आगाराला मिळाली नाही. आगारातून पंढरपूर व औरंगाबाद मार्गावर धावणाºया बसच्या काही फेºया रद्द करण्यात आल्या असल्याचे आगारातील कर्मचाºयातून बोलल्या जात आहे. त्यामुळे याकडे विभागीय नियंत्रकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.आरटीओ : कार्यालयाकडे पाठविणार बस४गंगाखेड आगारातील तीन बसची अवस्था खूपच बिकट झाल्याचे मान्य करीत मोडकळीस आलेल्या तीनही बसेस लवकरच आरटीओ कार्यालयाकडे पासिंगसाठी पाठविल्या जाणार असल्याची माहिती आगारप्रमुख आनंद धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तालुक्यातील खराब रस्त्यांमुळे बसची दुरवस्था होऊन त्या खिळखिळ्या होत असल्याचे ते म्हणाले.भंगार बसमुळे विद्यार्थी संतापलेपालम : तालुक्यातील ग्रामीण भागात मानव विकास मिशनतंर्गत विद्यार्थिनींना मोफत प्रवासासाठी भंगार गाड्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.पालम तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शाळेत येण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनंतर्गत ७ बसगाड्या गंगाखेड आगाराला दिल्या आहेत. या बसमधून विद्यार्थिनींना मोफत प्रवास तर प्रवाशांकडून भाडे आकारून ते महामंडळाला उत्पन्न म्हणून दिले जाते. महामंडळाकडून मानव विकास मिशनच्या नवीन बस ग्रामीण भागात न पाठविता इतर ठिकाणी प्रवासी वाहतुकीसाठी पाठविल्या जात आहेत.विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी गंगाखेड आगार, आतील भागात भंगार झालेल्या बसगाड्या ग्रामीण भागात पाठवत आहे. या बस अतिशय खराब झाल्या आहेत. बसमधील आसन व खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. तर बसचा पत्रा जागोजागी चिरून गेला आहे.खराब झालेल्या बसमधून प्रवास करताना विद्यार्थिनींना धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे फळा येथे नेहमीच भंगार बसगाड्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात असून मानव विकास मिशनंतर्गत खरेदी केलेल्या बस मुलींच्या प्रवासासाठी वापराव्यात, अशी मागणी पालम तालुक्यातून होत आहे.गंगाखेड आगारातील बसने गंगाखेड ते लोहा असा प्रवास केला. बसच्या मध्यभागापासून फाटलेला पत्रा व तुटलेली आसन व्यवस्था त्याच बरोबर धावत्या बसमध्ये खालीवरी होणारा पत्रा, बसमध्ये बसून पाहताना लोहा स्थानकापर्यंत आपण सुरक्षित पोहचतो की, नाही? अशी भिती वाटत होती. नादुरुस्त झालेल्या बस तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात.-भगवानराव ठुले, प्रवासी

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportराज्य परीवहन महामंडळ