शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

परभणी : वीज समस्यांमुळे शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:25 IST

महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी )  : महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पालम तालुक्यात वीजपुरवठा बिघाड आता नेहमीचाच झाला आहे़ अधिकारी अजूनही याकडे गांभिर्याने पाहत नाहीत. शेतकरी व लोकप्रतिनिधींनी वारंवार ओरड करूनही महावितरणाचा कारभार सुधारलेला नाही. दुष्काळी परिस्थितीत अडकलेल्या शेतकºयांना याचा दुहेरी फटका बसत आहे.कृषीपंपाना वीजपुरवठा करणारे दहा ते बारा रोहीत्र आतापर्यंत जळून खाक झाले आहेत. देयके भरल्याशिवाय नवीन रोहीत्र दिले जात नाहीत. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने रोहीत्र जळत आहेत. तसेच वीजपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने कृषीपंपही जळत आहेत. तालुक्यात मोठी ओरड होऊनही महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरूच आहे. यामुळे शेतकºयांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे़३३ केव्ही प्रस्ताव : अडगळीत४विजेची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे ताळमेळ बसत नसल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. पालममधील केंद्रांना वीज भार सहन होत नसल्याने लपंडाव सुरू झाला आहे. पेठशिवणी येथे १३३ केव्ही केंद्रांचा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडला आहे. त्यामुळे विजेची समस्या गंभीर बनली आहे.एकाच अभियंत्यावर भारपालम कार्यालयात तीन अभियंत्याची गरज आहे. पण सध्या केवळ उपअभियंता व्ही.डी. स्वामी एकटेच कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरच सर्व भार पडत आहे. दिवसभर वीज ग्राहकांच्या समस्या ऐकण्यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे बिघाड दुरुस्त करण्यासाठी वेळही मिळेनासा झाला आहे़परभणीच्या अधिकºयांची मनमानीशेतकरी देयके भरून रोहीत्र परभणी येथे घेऊन येत आहेत. मात्र या ठिकाणी अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू असून, रोहीत्रासाठी आठ -आठ दिवस चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके वाळून जात आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower ShutdownभारनियमनFarmerशेतकरी