शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

परभणी : शेतकऱ्यांचे एक कोटी ८१ लाख रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:48 IST

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत.

सत्यशील धबडगे।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत.मानवत व पाथरी तालुक्यासाठी ९ फेब्रुवारीपासून मानवत येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये विदर्भ फेडरेशनच्या वतीने तूर खरेदीस सुरुवात करण्यात आली़ पाथरी व मानवत तालुक्यातील १ हजार ७०५ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ नोंदणी झालेल्या शेतकºयांना केंद्र चालक व खरेदी- विक्री संघाच्या वतीने संदेशही पाठवून खरेदी केंद्रावर तूर आणण्याचे आवाहन केले जात आहे़ विदर्भ फेडरेशनने ६ मार्चपर्यंत १९९ शेतकºयांची २ हजार ५३५ क्विंटल तूर खरेदी केली आहे. तर १ हजार ५०४ शेतकºयांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे. परंतु, खरेदी केंद्रावर तूर विक्री करुनही एकाही शेतकºयाला रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे १९९ शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख १५ हजार ७५० रुपये थकले आहेत. ८ दिवसांमध्ये शेतकºयांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करण्याचे आदेश शासनाने दिलेले असतानाही महिना उलटला तरीही एकाही शेतकºयाच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही़ त्यामुळे शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या लग्नसराई सुरु आहे. अनेक शेतकºयांनी तुरीच्या भरोस्यावर लग्न कार्य ठरविले आहे. परंतु, रक्कमच हाती आली नसल्याने शतकरी हतबल झाले असून तुरीच्या रक्कमेसाठी चकरा मारत आहेत.एकच वजन काट्यामुळे संथ गतीने खरेदी४बाजार समितीच्या परिसरामध्ये ९ फेब्रुवारीला तूर खरेदीस सुरुवात झाली आहे. खरेदी केंद्रावर हमालामार्फत चाळणी प्रक्रिया सुरु आहे. दररोज १५० ते १८० क्विंटल मोजमाप होत आहे. एकच वजनकाटा असल्याने मोजमाप कमी होत आहे. २७ फेब्रुवारीपासून दोन वजनकाटे वाढविले होते़ परंतु, नवीन चाळणी उपलब्ध नसल्याने पुन्हा हे काटे बंद करण्यात आले आहेत. हमीभाव केंद्रावर तूर खरेदी करण्याची १८ एप्रिल ही अंतिम तारीख आहे. खरेदी केंद्रावरील खरेदी बघता तूर विक्रीसाठी शेतकºयांना किमान दीड महिना वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्वच शेतकºयांची तूर विदर्भ फेडरेशनमार्फत खरेदी होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण होत आहे.शेतकºयांचा ओढा हमी भाव केंद्राकडे४सध्या बाजारपेठेमध्ये ४ हजार ३०० पासून ४ हजार ५०० रुपये पर्यंत प्रति क्विंटल दर आहेत. तर हमीभाव केंद्रावर ५ हजार ४५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी तूर खरेदी केंद्र जवळ करीत आहेत. तालुक्यातील शेतकरी तूर विक्रीसाठी अजूनही नोंदणी करीत आहेत. त्यामुळे शेतकºयांची संख्याही वाढत आहे.सॉफ्टवेअरमध्ये अडचण असल्यामुळे तूर खरेदी केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास विलंब होत आहे.-भागवत सोळंके, जिल्हा विपणन अधिकारी, विदर्भ मार्केटींग फेडरेशन

टॅग्स :FarmerशेतकरीparabhaniपरभणीagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्डMONEYपैसा