शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

परभणी ; नववर्षाच्या पूर्वसंध्येला येलदरीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 12:22 AM

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी परभणी शहरात दाखल झाले असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्हीही एमबीआरमध्ये हा पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात परभणीकरांच्या पाचवीला पुंजलेली पाण्याची समस्या दूर होईल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी परभणी शहरात दाखल झाले असून मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील दोन्हीही एमबीआरमध्ये हा पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षात परभणीकरांच्या पाचवीला पुंजलेली पाण्याची समस्या दूर होईल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थ सहाय्यातून २००८ मध्ये परभणी शहरासाठी युआयडीएसएसएमटी योजनेला मंजुरी मिळाली. मंजुरी देताना १०८ कोटी रुपयांची असलेली ही योजना पुढे २८८ कोटी रुपयांवर पोहचूनही १० वर्षानंतर अमृत योजनेतील १०२ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यातून आता पूर्णत्वाला जात आहे. परभणी शहराला सध्या राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. ३० वर्षापूर्वीची ही योजना असून या काळात शहराची लोकसंख्या तीन पटीने वाढली आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीपुरवठा करताना मनपा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाला पारवा रोड परिसरातील चष्मे ए हयात विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. तरी देखील शहरवासियांना पाण्यासाठी ओढाताण करावी लागते. सद्यस्थितीला १५ दिवसांतून एकवेळा पाणी मिळते. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेची शहरवासीय आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.युआयडीएसएसएमटी योजनेला अमृत योजनेतून निधी मंजूर झाल्यानंतर कामांना गती देण्यात आली. मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्राधान्यक्रमाने ही योजना पूर्ण करुन घेतली. सद्यस्थितीला येलदरी येथील उद्भव विहीर, जलवाहिनी, धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्र, परभणी शहरातील जलवाहिनी आणि विविध भागात उभारण्यात आलेले जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ चाचण्यांचा सोपस्कार बाकी असून त्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या अंतर्गत मंगळवारी परभणी शहरात उभारलेल्या दोन एमबीआरमध्ये पाणी आणून चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रक्रियेच्या निमित्ताने येलदरी धरणातील पाणी प्रथमच प्रत्यक्ष जलवाहिनीतून शहरात पोहचले. यापूर्वी येलदरी धरणाचेच पाणी नदीपात्रातून राहटी बंधाºयात घेतले जात होते आणि तेथून शहरवासियांना पाणीपुरवठा होत होता. मात्र आता थेट येलदरी धरणाचे पाणी जलवाहिनीतून परभणीकरांना मिळणार आहे. मंगळवारी सायंकाळी हे पाणी गणपती चौकातील जलवाहिनीपर्यंत पोहचले होते आणि रात्री उशिरापर्यंत विद्यानगर आणि खाजा कॉलनीतील एमबीआरमध्ये ते पोहचणार आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना पाणी टंचाईलाही निरोप देण्याचा आनंद परभणीकरांना मिळणार आहे. नवीन वर्षामध्ये सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा आशेचा किरणही मावळत्या वर्षाने दाखविला आहे.बटन दाबून सोडले पाणी४धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष बटन दाबून परभणी शहरात पाणी सोडण्यात आले. यावेळी रविंद्र सोनकांबळे, सुनिल देशमुख यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.एम.बी.आर.मध्ये पाणी४धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून निघालेले पाणी परभणी शहरात दाखल होत असताना कॅनॉल परिसरात दोन ठिकाणी एअर वॉल्व्हमध्ये लिकेज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद करुन हे लिकेज काढण्यात आले. त्यांतर प्रत्यक्ष जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी सायंकाळी विद्यानगर आणि खाजा कॉलनीतील एम.बी.आर.मध्ये रात्री दाखल झाले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी