शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

परभणी : पर्यावरण अन् वीज बचतीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:57 PM

हळदी-कुंकू कार्यक्रमातील पारंपारिक बाबींना फाटा देत परभणी येथील वनिता वासवी क्लबच्या महिला सदस्यांनी पर्यावरण रक्षण-संवर्धन, वीज बचत आणि आयुर्वेद व सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देणारा स्तुत्य उपक्रम बुधवारी परभणी येथे राबविला़ हा उपक्रम पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हळदी-कुंकू कार्यक्रमातील पारंपारिक बाबींना फाटा देत परभणी येथील वनिता वासवी क्लबच्या महिला सदस्यांनी पर्यावरण रक्षण-संवर्धन, वीज बचत आणि आयुर्वेद व सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देणारा स्तुत्य उपक्रम बुधवारी परभणी येथे राबविला़ हा उपक्रम पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती़मकरसंक्रांतीनंतर महिलांच्या वतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सर्वत्र आयोजित करण्यात येत असतो़ परभणीतही अनेक ठिकाणी असे कार्यक्रम दररोज होत आहेत़ या संदर्भात होणाऱ्या पारंपारिक कार्यक्रमांना फाटा देत पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत असताना त्या संदर्भातील वेगवेगळ्या संकल्पना मांडून त्या नागरिकांसमोर नेत जनजागृती करण्याचा संकल्प शहरातील वनिता वासवी क्लबने केला आणि बुधवारी तो प्रत्यक्षातही अंमलात आणल्याचे पहावयास मिळाले़ येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाबरोबरच पाणी हेच जीवन, शाश्वत शेती, अन्न सुरक्षेची हमी, ऊर्जा वाचवा, पर्यावरण वाचवा, आमची माती आमची माणसं, टाळू वायू प्रदूषण असे विविध विषयांवरील स्टॉल्स उभारण्यात आले होते़ प्रत्येक स्टॉल्सवर या संदर्भातील कृतीयुक्त देखावे उभारण्यात आले होते़ तसेच जनजागृती करणारे पोस्टर्सही लावण्यात आले होते़ स्टॉल्सला भेटी देणाºया प्रत्येक महिलांना, संबंधित स्टॉल्सवरील संयोजक महिला या विषयावरील महत्त्वपूर्ण माहिती देवून जनजागृती करीत असल्याचे पहावयास मिळाले़ ज्या प्रमाणे वसुंधरा आपली जननी म्हणून आपले पोषण करते़ ती वसुंधरा आता संकटात असल्याने आपण पर्यावरण रक्षणाचा वसा घेऊ, या या दृष्टीकोणातून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली असल्याचे या क्लबच्या सदस्यांनी सांगितले़ सामूहिक प्रयत्नातून केलेला हा पर्यावरण, वीज, आयुर्वेद, सेंद्रीय शेती आदी बाबतचा जागर उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता़ येथे महानगरपालिकेच्या वतीनेही स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणारा स्टॉल उभारण्यात आला होता़ सकाळी ९ पासून मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड त्यांच्या पथकासह येथील स्टॉल्सवर येणाºया महिलांना कचºयाचे विघटन, या संदर्भातील परिणाम आदी बाबतची माहिती देताना दिसून आले़ दिवसभरात वासवी वनिता क्लबने राबविलेल्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़जनजागृती प्रदर्शिनी उद्घाटनास मान्यवर४वासवी वनिता क्लबच्या या जनजागृती प्रदर्शिनीचे डॉ़ संप्रिया पाटील यांच्या हस्ते दुपारी ३ च्या सुमारास उद्घाटन झाले़ यावेळी डॉ़ प्रिया ठाकूर, डॉ़ सुनील मोडक, अंबिका डहाळे, वासवी वनिता क्लबच्या अध्यक्षा शरयू वट्टमवार, सचिव अर्चना डमडेरे, कोषाध्यक्ष वैशाली मालेवार, मनपाचे कर्मचारी करण गायकवाड, नागेश नंदा, पठाण इलियास खान, मन्सूर अहमद आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिलाenvironmentपर्यावरण