परभणी : पर्यावरण अन् वीज बचतीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:57 PM2020-01-22T23:57:56+5:302020-01-22T23:58:31+5:30

हळदी-कुंकू कार्यक्रमातील पारंपारिक बाबींना फाटा देत परभणी येथील वनिता वासवी क्लबच्या महिला सदस्यांनी पर्यावरण रक्षण-संवर्धन, वीज बचत आणि आयुर्वेद व सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देणारा स्तुत्य उपक्रम बुधवारी परभणी येथे राबविला़ हा उपक्रम पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती़

Parbhani: Environment and electricity saving initiatives | परभणी : पर्यावरण अन् वीज बचतीचा जागर

परभणी : पर्यावरण अन् वीज बचतीचा जागर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : हळदी-कुंकू कार्यक्रमातील पारंपारिक बाबींना फाटा देत परभणी येथील वनिता वासवी क्लबच्या महिला सदस्यांनी पर्यावरण रक्षण-संवर्धन, वीज बचत आणि आयुर्वेद व सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देणारा स्तुत्य उपक्रम बुधवारी परभणी येथे राबविला़ हा उपक्रम पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती़
मकरसंक्रांतीनंतर महिलांच्या वतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सर्वत्र आयोजित करण्यात येत असतो़ परभणीतही अनेक ठिकाणी असे कार्यक्रम दररोज होत आहेत़ या संदर्भात होणाऱ्या पारंपारिक कार्यक्रमांना फाटा देत पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत असताना त्या संदर्भातील वेगवेगळ्या संकल्पना मांडून त्या नागरिकांसमोर नेत जनजागृती करण्याचा संकल्प शहरातील वनिता वासवी क्लबने केला आणि बुधवारी तो प्रत्यक्षातही अंमलात आणल्याचे पहावयास मिळाले़ येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाबरोबरच पाणी हेच जीवन, शाश्वत शेती, अन्न सुरक्षेची हमी, ऊर्जा वाचवा, पर्यावरण वाचवा, आमची माती आमची माणसं, टाळू वायू प्रदूषण असे विविध विषयांवरील स्टॉल्स उभारण्यात आले होते़ प्रत्येक स्टॉल्सवर या संदर्भातील कृतीयुक्त देखावे उभारण्यात आले होते़ तसेच जनजागृती करणारे पोस्टर्सही लावण्यात आले होते़ स्टॉल्सला भेटी देणाºया प्रत्येक महिलांना, संबंधित स्टॉल्सवरील संयोजक महिला या विषयावरील महत्त्वपूर्ण माहिती देवून जनजागृती करीत असल्याचे पहावयास मिळाले़ ज्या प्रमाणे वसुंधरा आपली जननी म्हणून आपले पोषण करते़ ती वसुंधरा आता संकटात असल्याने आपण पर्यावरण रक्षणाचा वसा घेऊ, या या दृष्टीकोणातून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली असल्याचे या क्लबच्या सदस्यांनी सांगितले़ सामूहिक प्रयत्नातून केलेला हा पर्यावरण, वीज, आयुर्वेद, सेंद्रीय शेती आदी बाबतचा जागर उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता़ येथे महानगरपालिकेच्या वतीनेही स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणारा स्टॉल उभारण्यात आला होता़ सकाळी ९ पासून मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड त्यांच्या पथकासह येथील स्टॉल्सवर येणाºया महिलांना कचºयाचे विघटन, या संदर्भातील परिणाम आदी बाबतची माहिती देताना दिसून आले़ दिवसभरात वासवी वनिता क्लबने राबविलेल्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़
जनजागृती प्रदर्शिनी उद्घाटनास मान्यवर
४वासवी वनिता क्लबच्या या जनजागृती प्रदर्शिनीचे डॉ़ संप्रिया पाटील यांच्या हस्ते दुपारी ३ च्या सुमारास उद्घाटन झाले़ यावेळी डॉ़ प्रिया ठाकूर, डॉ़ सुनील मोडक, अंबिका डहाळे, वासवी वनिता क्लबच्या अध्यक्षा शरयू वट्टमवार, सचिव अर्चना डमडेरे, कोषाध्यक्ष वैशाली मालेवार, मनपाचे कर्मचारी करण गायकवाड, नागेश नंदा, पठाण इलियास खान, मन्सूर अहमद आदींची उपस्थिती होती़

Web Title: Parbhani: Environment and electricity saving initiatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.