परभणी : कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:49 IST2018-07-26T00:48:24+5:302018-07-26T00:49:13+5:30
न्यायालयाच्या निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघातील एका कर्मचाºयाने २५ जुलै रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी सतर्कता दाखवित कर्मचाºयास तत्काळ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला़

परभणी : कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : न्यायालयाच्या निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघातील एका कर्मचाºयाने २५ जुलै रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी सतर्कता दाखवित कर्मचाºयास तत्काळ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला़
कापूस पणन महासंघातील कर्मचाºयांनी पाचव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी नागपूरच्या औद्योगिक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते़ ३ मे २०१७ रोजी औद्योगिक न्यायालयाने कर्मचाºयांच्या बाजुने निकाल दिला़ तेव्हापासून आजपर्यंत महासंघातील लिपिकवर्गीय कर्मचाºयांना हा वेतन आयोग लागू झाला नव्हता़ तेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पाचवा वेतन आयोग लागू करावा आणि १२ महिन्यांच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी कर्मचारी मुरलीधर उत्तमराव उंडेगावकर यांनी केली होती़ याच मागणीसाठी २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता़
दरम्यान, बुधवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास मुरलीधर उंडेगावकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले़ हातातील पेट्रोलची बाटली घेऊन त्यांनी ती अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला़ तेवढ्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले़
या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़