परभणी: विशेष मोहिमेत सहा जुगाऱ्यांसह दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:27 IST2019-04-16T23:27:34+5:302019-04-16T23:27:56+5:30
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी विशेष मोहीम राबवून जुगार खेळणाºया सहा जणांसह शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध दारू विक्री करणाºया ४ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे.

परभणी: विशेष मोहिमेत सहा जुगाऱ्यांसह दारू पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी विशेष मोहीम राबवून जुगार खेळणाºया सहा जणांसह शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध दारू विक्री करणाºया ४ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे.
येथील रेल्वेस्थानकाच्या गोदामातील मोकळ्या जागेत जुगार सुरू असताना पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. त्यावेळी अर्जून बंडू गव्हाणे, सोपान सटवाजी काळे, शेख इलियास शेख अय्युब, सय्यद मुजीब सय्यद रहीमोद्दीन, दत्ता राजाराम लांडगे, कुंडलिक ज्ञानोबा धर्मे हे जुगार खेळताना आढळले.
या कारवाईत नगदी १० हजार रुपये, तीन मोटारसायकल असा १ लाख १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच खंडोबा बाजार येथील शेख शाहरुख शेख रशीद याच्या ताब्यातून १ हजार ८७२ रुपयांची दारू, भिखूलाल पेट्रोलपंपाजवळील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी जॉबाज खान गुलाब खान पठाण याच्या ताब्यातून ३ हजार ६०० रुपयांची दारू आणि एक मोटारसायकल, पाथरी तालुक्यातील वडी येथल नाथा नामदेव रोडे याच्या ताब्यातून २ हजार ५०० रुपयांची देशी दारू आणि राणीसावरगाव परिसरातील दांडखिळा ढाबा येथे टाकलेल्या छाप्यात आरोपी प्रमोद प्रकाश चव्हाण रा.जालना याच्या ताब्यातून १० हजार ५६८ रुपयांची दारु पोलिसांनी जप्त केली आहे.