परभणी: बसस्थानकातील पाणपोईची झाली दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:04 IST2019-04-07T23:04:23+5:302019-04-07T23:04:47+5:30
येथील बसस्थानकात प्रवाशांसाठी असलेल्या पाणपोईची अत्यंत दुरवस्था झाल्याने तापत्या उन्हात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़

परभणी: बसस्थानकातील पाणपोईची झाली दूरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : येथील बसस्थानकात प्रवाशांसाठी असलेल्या पाणपोईची अत्यंत दुरवस्था झाल्याने तापत्या उन्हात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़
संत जनाबाई यांची जन्मभूमी व परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या गंगाखेड येथील बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी दोन पाणपोर्इंची उभारणी करण्यात आली आहे़ सद्यस्थितीत या दोन्ही पाणपोर्इंची दुरवस्था झाल्याने यामध्ये पाणी साठवण बंद केली आहे़ त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे बसस्थानकात पाण्याअभावी हाल होत आहेत़ परिणामी प्रवाशांना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़ विशेष म्हणजे गंगाखेड बसस्थानकातून ये-जा करणाºया प्रवाशांसाठी शहरातील भंडारी परिवाराने सहा वर्षापूर्वी स्वखर्चातून बसस्थानक परिसरात विंधन विहीर घेतली होती. यावेळी उभारलेल्या पाणपोईचे ८ नळ निखळून पडले आहेत़ त्याचबरोबर प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजुस असलेल्या फिल्टरसह बसविलेली पाणपोई गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे़ दरवर्षी उन्हाळ्यात पाणपोई सुरू करणाºया सामाजिक संघटना, खाजगी संस्थांनी सध्या तरी पाणपोई सुरू केल्याचे दिसत नाही़
परिणामी प्रवाशांना सध्या तरी विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
लोकसहभागातून घेतला बोअर
गंगाखेड बसस्थानकात असलेल्या जुन्या दोन्ही बोअरची पाणी पातळी खालावली आहे़ त्यामुळे आगारातील वाहनांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी लागणारे पाणी उपलब्ध व्हावे, या करीता आगारात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी वर्गणी गोळा करून एक बोअर घेतला आहे़ परंतु, हा बोअरही केवळ २० मिनिटे चालत असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे कर्मचाºयांतून बोलले जात आहे़ विशेष म्हणजे गंगाखेड आगारातील बस धुण्यासाठी तसेच कार्यरत कर्मचाºयांसाठी विकतच्या पाण्याची व्यवस्था केली जात असल्याचे स्थानक प्रमुख आऱव्ही़ हडबे यांनी सांगितले़