परभणी : परवानगीपेक्षा अधिक वाळुचा केला उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:08 IST2018-03-22T00:08:40+5:302018-03-22T00:08:40+5:30
मानवत तालुक्यातील वांगी येथील वाळू धक्क्यावरून १ हजार ४८० ब्रास वाळुचा अधिक उपसा झाल्याची बाब ईटीएस मोजमापात उघड झाली असून, भूमिलेखच्या अधीक्षकांनी तसा अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे़

परभणी : परवानगीपेक्षा अधिक वाळुचा केला उपसा
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : तालुक्यातील वांगी येथील वाळू धक्क्यावरून १ हजार ४८० ब्रास वाळुचा अधिक उपसा झाल्याची बाब ईटीएस मोजमापात उघड झाली असून, भूमिलेखच्या अधीक्षकांनी तसा अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे़
अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी २० मार्च रोजी वांगी येथील वाळू धक्क्याला भेट दिली, तेव्हा परवानगीपेक्षा अधिक वाळू उपसा होत असल्याचा संशय आल्याने ईटीएसद्वारे मोजमाप करण्याचे आदेश त्यांनी दिले होते़ वांगी येथील वाळू धक्का बार्शी येथील श्रीराम कन्स्ट्रक्शनतर्फे अण्णासाहेब काजळे या कंत्राटदाराला सुटला आहे़ ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ४ हजार ४१७ ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे़ अप्पर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर भूमिलेख विभागाचे अधीक्षक गामणे यांनी या वाळू धक्क्याची ईटीएसद्वारे मोजणी केली़ यावेळी मंडळ अधिकारी जोशी, तलाठी बागूल यांची उपस्थिती होती़ १४ मार्च २०१८ रोजी मोजमाप केले होते़ त्यावेळी २ हजार ५३८ ब्रास वाळुचा उपसा झाला होता़ २० मार्च रोजी केलेल्या मोजमापात ३ हजार २५९ ब्रास असा आजपर्यंत ५ हजार ८९७ ब्रास वाळू उपसा झाल्याचा अहवाल गामणे यांनी दिला आहे़ त्यामुळे या ठिकाणाहून १ हजार ४१७ ब्रास वाळू अधिक उपसा झाला असून, आता या कंत्राटदाराविरूद्ध काय कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे़ तसेच वाळू धक्का हा मानवत तालुक्यात असताना ठेकेदाराने दुसरा रस्ता तयार करून मानवत येथील वाळू सोनपेठ, लातूर, बीड आदी ठिकाणी नेली असल्याचेही स्पष्ट झाले आहे़