परभणी : ट्रकचे स्टेअरिंग तुटल्याने वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:51 IST2019-05-25T00:51:18+5:302019-05-25T00:51:49+5:30
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शुक्रवारी सकाळी एका ट्रकचे स्टेअरिंग तुटल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

परभणी : ट्रकचे स्टेअरिंग तुटल्याने वाहतूक विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शुक्रवारी सकाळी एका ट्रकचे स्टेअरिंग तुटल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
शुक्रवारी सकाळी साधारणत: ८ वाजण्याच्या सुमारास रेल्वेस्थानकाकडून वसमत रस्त्याकडे जाणारा ट्रक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जात असताना पुतळ्याजवळच या ट्रकचे स्टेअरिंग तुटले. त्यामुळे रात्री साडेनऊ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र दिवसभर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.