शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

परभणी : ६१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:10 IST

आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ लाख ४१ हजार २५८ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ लाख ४१ हजार २५८ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार आहे़आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या नगदी पिकांबरोबरच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ संपूर्ण जिल्हाभरात नुकसानीचा आकडा वाढत असल्याने राज्य शासनाने बाधित पिकांचे पंचनामे करून या पिकांना मदत देण्याची घोषणा केली़ त्यानुसार शेतपिकांना ८ हजार रुपये प्रतिहेक्टर अनेक फळपिकांना १८ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकºयांची यादी शासनाकडे पाठविली होती़ प्रशासनाला आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या निधीचे वितरण शेतकºयांना झाले असले तरी अजूनही सव्वा लाख शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याने जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी नोंदविली होती़ या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १ फेब्रुवारी रोजी राज्यातील अतिवृष्टीने बाधित पिकांसाठी ७५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, त्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकºयांसाठी ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपये प्राप्त झाले असून, हा निधी मिळाल्यानंतर जिल्ह्यास ३४० कोटी ५१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे़ हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकºयांना त्याचे वितरण होणार असून, तहसीलमार्फत प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे़साडेचार लाख शेतकºयांच्या पिकांचे नुकसान४आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकºयांच्या ४ लाख ५६ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने ३६६ कोटी ६ हजार २६ रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती़४त्यातुलनेत आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यातून ३ लाख २२ हजार १०३ शेतकºयांना मदत निधी वितरित करण्यात आला आहे़ आणखी १ लाख ४१ हजार २५८ शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत़४वंचित राहिलेल्या या शेतकºयांसाठी जिल्हा प्रशासनाने १०१ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती़ त्या तुलनेत ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे या रकमेतून उर्वरित शेतकºयांना निधीचे वितरण केले जाणार आहे़मदतीपासून वंचित असलेले शेतकरी४जिल्हा प्रशासनाच्या माहिती प्रमाणे १ लाख १५ हजार ३३८ शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १९ हजार २४४, सेलू तालुक्यातील १२ हजार ७५६, जिंतूर तालुक्यातील २७ हजार ६११, पाथरी ९ हजार ४३४, मानवत ८ हजार १४०, सोनपेठ ६ हजार ९९१, गंगाखेड १० हजार ६६५, पालम ९ हजार ५५९ आणि पूर्णा तालुक्यातील १० हजार ९३८ शेतकºयांना अनुदान वाटप करणे शिल्लक आहे़ त्यासाठी जिल्हा प्रशासनाने १०१ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी नोंदविली होती़ मात्र प्रत्यक्षात ६१ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाल्याने प्रशासनाला आणखी निधीची गरज भासणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकार