परभणी : ६१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:09 AM2020-02-03T00:09:37+5:302020-02-03T00:10:25+5:30

आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ लाख ४१ हजार २५८ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार आहे़

Parbhani: The district receives funds of Rs 1 crore | परभणी : ६१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त

परभणी : ६१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिसºया टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी १ फेब्रुवारी रोजी एका आदेशान्वये वितरित केला आहे़ त्यामुळे दुष्काळ निधीतून १ लाख ४१ हजार २५८ शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार आहे़
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या नगदी पिकांबरोबरच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ संपूर्ण जिल्हाभरात नुकसानीचा आकडा वाढत असल्याने राज्य शासनाने बाधित पिकांचे पंचनामे करून या पिकांना मदत देण्याची घोषणा केली़ त्यानुसार शेतपिकांना ८ हजार रुपये प्रतिहेक्टर अनेक फळपिकांना १८ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकºयांची यादी शासनाकडे पाठविली होती़ प्रशासनाला आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या निधीचे वितरण शेतकºयांना झाले असले तरी अजूनही सव्वा लाख शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याने जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी नोंदविली होती़ या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १ फेब्रुवारी रोजी राज्यातील अतिवृष्टीने बाधित पिकांसाठी ७५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, त्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकºयांसाठी ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपये प्राप्त झाले असून, हा निधी मिळाल्यानंतर जिल्ह्यास ३४० कोटी ५१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे़ हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकºयांना त्याचे वितरण होणार असून, तहसीलमार्फत प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे़

साडेचार लाख शेतकºयांच्या पिकांचे नुकसान
४आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकºयांच्या ४ लाख ५६ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने ३६६ कोटी ६ हजार २६ रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती़
४त्यातुलनेत आतापर्यंत २७९ कोटी ११ लाख ४ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यातून ३ लाख २२ हजार १०३ शेतकºयांना मदत निधी वितरित करण्यात आला आहे़ आणखी १ लाख ४१ हजार २५८ शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत़
४वंचित राहिलेल्या या शेतकºयांसाठी जिल्हा प्रशासनाने १०१ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती़ त्या तुलनेत ६१ कोटी ४० लाख ५२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे या रकमेतून उर्वरित शेतकºयांना निधीचे वितरण केले जाणार आहे़
मदतीपासून वंचित असलेले शेतकरी
४जिल्हा प्रशासनाच्या माहिती प्रमाणे १ लाख १५ हजार ३३८ शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १९ हजार २४४, सेलू तालुक्यातील १२ हजार ७५६, जिंतूर तालुक्यातील २७ हजार ६११, पाथरी ९ हजार ४३४, मानवत ८ हजार १४०, सोनपेठ ६ हजार ९९१, गंगाखेड १० हजार ६६५, पालम ९ हजार ५५९ आणि पूर्णा तालुक्यातील १० हजार ९३८ शेतकºयांना अनुदान वाटप करणे शिल्लक आहे़ त्यासाठी जिल्हा प्रशासनाने १०१ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी नोंदविली होती़ मात्र प्रत्यक्षात ६१ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाल्याने प्रशासनाला आणखी निधीची गरज भासणार आहे़

Web Title: Parbhani: The district receives funds of Rs 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.