कोरोना लसीकरणात परभणी जिल्हा २६ व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:52+5:302021-02-05T06:05:52+5:30
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्हा लसीकरणासाठी पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी आरोग्य विभागाला जनजागृती करण्यावर भर ...

कोरोना लसीकरणात परभणी जिल्हा २६ व्या क्रमांकावर
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्हा लसीकरणासाठी पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी आरोग्य विभागाला जनजागृती करण्यावर भर द्यावा लागणार आहे.
जिल्ह्यात लसीचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध
कोरोना लसीकरणााठी जिल्ह्यामध्ये लसीचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्राची संख्याही वाढविली जात आहे. त्यामुळे लसीकरण करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
पहिल्या टप्प्यात सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड या लसीचे ९ हजार ३३० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लसीकरण करण्यात येत असून, सध्या ६ केंद्रांवर ही मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात ९ हजार ३३० डोसेस उपलब्ध झाले आहेत. त्यातून आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सध्या मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास दुसऱ्या टप्प्यातील लसीची मागणी नोंदविली जाईल, असे आरोग्य सूत्रांनी सांगितले.