शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

परभणी : ‘जलसिंचन’ योजनेतून जिल्ह्याला वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:28 AM

राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलसिंचन प्रकल्प योजनेतून परभणी जिल्ह्याला निकषात बसत नसल्याच्या कारणावरुन वगळण्यात आले आहे. दीड वर्षात जिल्ह्यात १६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलसिंचन प्रकल्प योजनेतून परभणी जिल्ह्याला निकषात बसत नसल्याच्या कारणावरुन वगळण्यात आले आहे. दीड वर्षात जिल्ह्यात १६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे.राज्य शासनाच्या ‘बळीराजा संजीवनी’ योजनेंतर्गत राज्यातील दुष्काग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी जलसिंचन प्रकल्प योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी केंद्र शासनाने राज्याकरीता ३ हजार ८५१.४१ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य विशेष पॅकेजअंतर्गत देण्याचा निर्णय घेतला होता. या निधीतून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी १७ प्रकल्पांची निवड करण्यात आली. त्यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील ५, जालना जिल्ह्यातील ६, नांदेड जिल्ह्यातील २, बीड जिल्ह्यातील १, लातूर जिल्ह्यातील ३, विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील १, अमरावती जिल्ह्यातील १८, अकोल्यातील ७, वाशिममधील १८, यवतमाळमधील १४ व बुलढाणा जिल्ह्यातील ८ अशा एकूण ८३ प्रकल्पांचा समावेश होता. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील ज्या प्रकल्पांना केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता आहे, असे तसेच बांधकामाधीन लघु प्रकल्प जे पुढील तीन वर्षात पूर्ण होऊ शकतील, अशा प्रकल्पांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. हे प्रकल्प २०२०-२१ वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. या निकषामध्ये मराठवाड्यातील परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यातील बांधकामाधीन प्रकल्प बसत नसल्याने त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला नसल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.परभणी जिल्ह्यात गतवर्षी १२९ शेतकºयांनी नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्या. यावर्षी जानेवारी ते १२ जुलै २०१९ पर्यंत ३९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. दीड वर्षात जिल्ह्यातील १६८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असतानाही शासनाला मात्र या संदर्भात गांभीर्य वाटत नाही. परिणामी जलसिंचन प्रकल्प योजनेतून जिल्हा वगळला गेला आहे.जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाची कामे राहिली अपूर्ण४जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या चाºयांची अनेक कामे अपूर्ण आहेत. डिग्रस मध्यम प्रकल्पाचेही काम अपूर्ण आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या अखत्यारित येणाºया डाव्या व उजव्या कालव्याच्या चाºयांचीही अनेक वर्षापासून दुरुस्ती झालेली नाही. गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयास दरवाजे नाहीत. तारुगव्हाण येथील बंधाºयाचे काम अर्धवट अवस्थेत आहे.४ ही मोजकी उदाहरणे असली तरी यापेक्षाही अनेक मोठे, लघु व मध्यम प्रकल्पाची कामे पूर्ण होणे बाकी आहेत. असे असताना जिल्ह्याला निधी मिळण्याची अपेक्षा आहे; परंतु, प्रशासकीय स्तरावरुन कागदीमेळ घालून निधी मिळविण्याासठी अडथळा निर्माण केला जात आहे.४ लघु पाटबंधारे विभागाने २०१६-१७ मध्ये दिलेल्या अहवालात परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यांमध्ये एकूण २६८ लघु पाटबंधाºयांची कामे पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. मार्च २०१६ अखेर जिल्ह्यातील ५९ तर मार्च २०१७ अखेर ३४७ कामे पूर्ण झाली आहेत. वापरात असलेल्या कामाचे २७ हजार ४४३ हेक्टर लाभक्षेत्र असून ९ हजार ६९० हेक्टर जमीन यामुळे ओलिताखाली आल्याचा या विभागाचा दावा आहे. प्रत्यक्षात फिल्डवरील परिस्थिती वेगळी आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प