शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

परभणी जिल्ह्याला मिळाला ८० कोटींचाच विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:10 IST

खरीप हंगामामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना ८० कोटी ३७ लाख २८ हजार रुपयांचा विमा मंजूर केला असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली. विशेष म्हणजे मागील वर्षी गारपीट, अवकाळी पाऊस आणि कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे शेतकºयांच्या हाती एकही पीक लागले नसताना कंपनीने मात्र ८० कोटींवरच बोळवण केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना ८० कोटी ३७ लाख २८ हजार रुपयांचा विमा मंजूर केला असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली. विशेष म्हणजे मागील वर्षी गारपीट, अवकाळी पाऊस आणि कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे शेतकºयांच्या हाती एकही पीक लागले नसताना कंपनीने मात्र ८० कोटींवरच बोळवण केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हे दोन महत्त्वाचे हंगाम असून या हंगामात नैसर्गिक संकटांमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिल्या जाते. त्यासाठी शेतकºयांना पिकांची जोखीम रक्कम विमा कंपनीकडे भरावी लागते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकºयांना नुकसानीपासून दिलासा मिळण्यासाठी विम्याची तरतूद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यासाठी रिलायन्स या खाजगी विमा कंपनीची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी राष्ट्रीय विमा कंपनीमार्फत शेतकºयांना विम्याची रक्कम दिली जात होती. गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, सूर्यफुल, ज्वारी, मूग या पिकांची जिल्ह्यात पेरणी झाली. शेतकºयांनी पीकनिहाय विमा उतरविला. जिल्हाभरातील ६ लाख ९७ हजार ७१७ खातेदारांनी १४० कोटी ५६ लाख २१५ रुपयांची रक्कम विम्याच्या हप्त्यापोटी जमा केली. यावर्षीच्या हंगामात प्रथमच पीक कर्ज खातेदारांची रक्कम कर्जातून विम्यामध्ये वळती करण्यात आली. तर बिगर कर्जदारांनी बँकांमध्ये रांगा लावून विमा रक्कम भरली आहे. ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली. त्यापैकी ४ लाख २४ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला.खरीप हंगामामध्ये जिल्हाभरात पावसाचे प्रमाण कमी राहिले. सरासरीच्या ३१ टक्के पाऊस कमी झाला. त्यात पालम, गंगाखेड, सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये तर पावसाची टक्केवारी कमी असल्याने त्याचा फटका पिकांच्या वाढीला बसला. सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. तर बोंडअळीच्या प्रादूर्भावाने शेतकºयांचे कंबरडे मोडले. नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली. परंतु, याच पिकाने धोका दिला. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी नुकसानीच्या तुलनेत विम्याची रक्कम हाती लागेल, अशी शेतकºयांची आशा होती. मात्र शेतकºयांनी भरलेली रक्कमही त्यांना विमा कंपनीकडून परत मिळाली नाही. कृषी विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्याला ८० कोटी ३७ लाख २८ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. त्यात ५८ कोटी ८२ लाख ४९ हजार रुपये खातेदारांच्या खात्यावर जमा झाले. ६ लाख ९७ हजार ७१७ खातेदारांपैकी २ लाख ३२ हजार ९०१ शेतकºयांना विम्याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित ४ लाख ६४ हजार ८१६ शेतकरी मात्र विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. ज्या शेतकºयांच्या खात्यात विमा रक्कम जमा झाली, ते शेतकरी देखील नाराजीचा सूर आवळत आहेत. कारण नुकसानीच्या तुलनेत विम्याची रक्कम ही कमी असल्याने विमा काढूनही उपयोग झाला नसल्याची भावना या शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. एकंदर यावर्षी विमा कंपनीने शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप आता होत असून कंपनीच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.विमा कंपनीविषयी वाढली ओरडशेतकºयांना विमा कंपनीने फसविल्याची भावना जिल्ह्यामध्ये निर्माण झाली असून कंपनीच्या विरोधात सर्वच पक्षांनी आंदोलने केली आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष अशा सर्वच पक्षांनी कंपनीच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.अधिकाºयांची डोळेझाकजिल्ह्यातील महसूल विभागामार्फत दरवर्षी पिकांची आणेवारी काढली जाते. या आणेवारीवरुन पीक परिस्थिती लक्षात येते. जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर केली. त्यात बहुतांश गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाली आहे. या आणेवारीनुसार शेतकºयांना ५० टक्केही उत्पन्न झाले नसल्याचे सिद्ध होते. त्यामुळे शेतकरी विमा रक्कमेसाठी पात्र असतानाही विमा कंपनीने मात्र आणेवारी पद्धतीनुसार विमा मंजूर न करता पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून विमा मंजूर केला. त्यामुळे शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस