परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:35 AM2019-10-22T00:35:57+5:302019-10-22T00:36:19+5:30

परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून इतर तालुके या सरासरीच्या जवळ पोहचत आहेत. परिणामी जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचे संकट काही काळापुरते पुढे ढकलले गेले आहे.

Parbhani district also received rain for the second consecutive day | परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून इतर तालुके या सरासरीच्या जवळ पोहचत आहेत. परिणामी जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचे संकट काही काळापुरते पुढे ढकलले गेले आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये खंड घेत पाऊस झाला. हा पाऊस प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मात्र झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांना तारले असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम होता. मान्सूनचा पाऊस साधारणत: एक महिना उशिराने जिल्ह्यात दाखल झाला आणि एक महिना उशिरानेच परतीला निघाला आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात यावर्षी पाऊस होत आहे. परभणी जिल्ह्यात सरासरी ७७४ मि.मी.पाऊस होतो. यावर्षी आतापर्यंत ६६२.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या ८५ टक्के पाऊस झाला असून अजून १५ टक्के पावसाची तूट आहे.
दरम्यान, दोन दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस होत आहे. शनिवारी सेलू आणि पाथरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यानंतर रविवारीही हा पाऊस जिल्ह्यात बरसला. पालम तालुक्यात सर्वाधिक ४८ मि.मी. पाऊस झाला आहे. तर परभणी १०.७६, पूर्णा ३५.२०, गंगाखेड २६.५०, सोनपेठ ३४, सेलू ४.८०, पाथरी १३.३३, जिंतूर ०.५० आणि मानवत तालुक्यात ७.६७ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्हाभरात सरासरी २०.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६२ टक्के पाऊस या तालुक्यात नोंद झाला आहे. तर जिंतूर तालुक्यातही केवळ ६५ टक्के पाऊस आतापर्यंत बरसला. पालम तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ मि.मी. असून या तालुक्यात आतापर्यत ७३२.३५ मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या १०५ टक्के पाऊस अधिक नोंद झाला आहे.
या शिवाय पाथरी तालुक्याची वार्षिक सरासरी ७६८.५० मि.मी. असून या तालुक्यात ७७९ मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झाला आहे. त्याच प्रमाणे पूर्णा तालुक्याची सरासरी ८०४ मि.मी. असून या तालुक्यात ७९६ मि.मी. (९० टक्के), गंगाखेड तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ मि.मी. असून या तालुक्यात ६४४.५० मि.मी. (९२ टक्के), सोनपेठ तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७ मि.मी. असून तालुक्यात ५७९ मि.मी. (८३ टक्के), सेलू तालुक्यात ६५४ मि.मी. (८०.२ टक्के), मानवत तालुक्यात ८१६ मि.मी.पैकी ७०५ मि.मी. म्हणजे ८६.४ मि.मी. पाऊस झाला आहे.
खडकपूर्णा प्रकल्पातून १० क्युसेस पाण्याचा विसर्ग
४पूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पातून २१ आॅक्टोबर रोजी पहाटे ३.३५ वाजता ७ दरवाजांमधून १० हजार ४०७ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आवश्यकता भासल्यास हा विसर्ग वाढविला जाईल, अशी माहिती खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिली. त्यामुळे पूर्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या येलदरी प्रकल्पामध्ये १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून सोडलेले पाणी येलदरी प्रकल्पामध्ये येणार आहे.
४सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प दोन वर्षांपासून मृतसाठ्यात आहे. या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला मृतसाठ्यात ६२ दलघमी पाणी उपलब्ध आहे. निम्न दुधना प्रकल्पावर सेलू तालुक्यासह इतर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे. शनिवारी या तालुक्यात विक्रमी ११७ मि.मी. पाऊस झाला होता. या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोमवारीही तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती.

Web Title: Parbhani district also received rain for the second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.