परभणी : जिल्हाभरात ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:24 AM2019-08-10T00:24:26+5:302019-08-10T00:24:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : २००५ नंतर सेवेत आलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, ...

Parbhani: Dams' agitation of village workers across the district | परभणी : जिल्हाभरात ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

परभणी : जिल्हाभरात ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : २००५ नंतर सेवेत आलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, यासह विविध प्रलंबित मागण्या संदर्भात ग्रामसेवक संघटनांनी जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर ९ आॅगस्ट रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
शासन दरबारी प्रलंबित असलेले विविध प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने ९ आॅगस्ट रोजी परभणी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात राहुल पाटील, संतोष जाधव, आनंद खरात, एस.एल. खटींग, बी.बी. लांडे, एस.डी. धरणे, पी.ए. हरकळ, ए.आर. लाडेकर, व्ही.ए. पवार, के.आर. गव्हाणे आदींसह तालुक्यातील ग्रामसेवक सहभागी झाले होेते.
सोनपेठमध्ये प्रशासनाला निवेदन
प्रवास भत्यात सुधारणा करावी, यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर शुक्रवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
या आंदोलना दरम्यान ग्रामसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, आर.पी. सोळंके, एल.डी. पितळे, आर.बी. पवार, बी.एन. मुंडे, एस.व्ही. चौधरी, एस.आर. नरारे, एम.के. सय्यद, एस.ए. देशपांडे, पी.एम. शेळके, व्ही.व्ही. धरणे, पी.ए. कदम, व्ही.व्ही. शिंदे, बी.आर. मोरे, एस.बी. सोळंके, आर.बी. सरवदे, के.आर. शिंदे, एन.एन. जोगदंड, एम.बी. भालेकर, जी.पी.यादव, पी.एम. भोसले, एस.एस. भोसले, बी.बी. पवार, एस.ए. भवर, एस. आर. देशमुख आदी सहभागी झाले होते.
ग्रामसेवक संघटना, पाथरी
येथील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शुक्रवारी पं.स. कार्यालयासमोर धरणे अंदोलन करण्यात आले. आंदोलनात आर.टी. राठोड, के.जी. फंड, व्ही.के. घाटूळ, एस.बी. गमे, जी.एस. मदनकर, व्ही.बी. ठोंबरे, आर.जे. आडसकर, आर.डी. संगेवार, पी.एस. चौधरी, जी.एस. देवडे, के.एम. बोरवंडकर, एस.बी. घुंबरे आदी ग्रामसेवक सहभागी झाले होते.
ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन
पूर्णा- तालुक्यातील ग्रामसेवकांनी ९ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंंदोलन केले. त्यानंतर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात अशोक खुपसे, केशव भूसारे, तुकाराम साठे आदी ग्रामसेवक सहभागी झाले होते.
सेलूत तालुका प्रशासनाला निवेदन
विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शुक्रवारी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष आर.एस. वाव्हळे, अजय जैस्वाल, एम.यु. शिवभगत, आर.एन. बोरुडे, जीवन खरात, के.ए. झुकाटे, एन.ई. भोसले यांच्यासह सर्व २८ ग्रामसेवक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला ग्रासमेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामसेवक संघटनेचे गंगाखेड येथे आंदोलन
४शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष डी.बी. केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली ९ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले.
४या आंदोलनात कुलदीप मादरपल्ले, के.व्ही. मुंडे, बी.डी. भोसले, एम.एन. अष्टुरे, आर.व्ही. नलवाड, ए.एस. वैरागड, के.एन. लटपटे, एम.बी. मुंडे, आर.बी. रेंगे, एस.डी. पांडे, डी.एम. मुंडे, ए.बी. पतंगे, ए.आर. फड, एस.के. कदम, पी.डी. आळणे, वर्षा साळवे, यु.डी. खुपसे, पी.आर. जाधव, एन.डी. मुंडे, आर.के. गिते, एच.डी. खुपसे, एस.बी. तिडके, पी.व्ही. कांबळे, ए.जी. पांचाळ, एम.बी. कांबळे, डी.एम. घुंबरे, पी.आर. बोरीकर, बी.एन. सांगळे, डी.बी. नाहनाळे, एम.पी. कारले, बी.एम. तोंडगे आदी सहभागी झाले होते.
मानवतमध्येही आंदोलन
४मानवत - राज्यातील २२ हजार ग्रामसेवक संवर्गाच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी ९ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
४या अंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष एम.व्ही. व्हरकटे, सचिव के.टी. कानडे, उपाध्यक्ष पी.एम. घाटगे यांच्यासह सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते.
पालम येथील तहसीलसमोर धरणे
४पालम- येथील तहसील कार्यालयासमोर पंचायत समितीमधील ग्रामसेवकांनी विविध मागण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. त्यामुळे दिवसभर कामानिमित्त पं.स. कार्यालयात आलेल्या ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
४या आंंदोलनात तालुकाध्यक्ष केशव खाडे, सचिव गजानन शेवटे, अजित तांदळे, सिंधू कीर्तनकार, नागेश कंटेकर, अच्युत भालेराव, सुनील एरंडे, बाळू पवार, आकाश सोनाळे, नंदू बेलके, विनोद नागरे, सीताराम जाधव, विनोद टोम्पे, रेश्मा चव्हाण आदीसह ग्रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
जिंतुरात निवेदन
४जिंतूर- ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिंतूर पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवक युनियन तालुका शाखेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
४यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला ग्रामसेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

Web Title: Parbhani: Dams' agitation of village workers across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.