शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

परभणी : जुन्या पेन्शनसाठी धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:06 AM

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ पूर्ववत लागू करुन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने २७ जानेवारी रोजी जिंतूर रोडवरील जि.प. परिसरातून कर्मचाºयांचा मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ पूर्ववत लागू करुन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने २७ जानेवारी रोजी जिंतूर रोडवरील जि.प. परिसरातून कर्मचाºयांचा मोर्चा काढण्यात आला.जिल्हा परिषद कार्यालयासमोरुन या मोर्चाला प्रारंभ झाला. शासकीय सेवेतील विविध संवर्गातील कर्मचारी हातात फलक घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. उड्डाणपूल, बसस्थानक, रेल्वेस्थानकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाºयांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाºया कर्मचाºयांना १९८२ व १९८४ अंतर्गत निवृत्ती वेतन योजना बंद करुन परिभाषित शदायी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे स्वरुप व अंमलबजावणी पाहता जुन्या पेन्शन प्रमाणे सुनिश्चित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन असुरक्षित झाले आहे. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष असून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे २३ आॅक्टोबर २०१७ चा वरिष्ठ वेतन श्रेणीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षेतून वगळण्यात यावे इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आंदोलनात संघटनेचे विभागीय अध्यक्ष सिकंदर पाचमासे, राज्य समन्वयक प्रद्मुम्न शिंदे, शाम गिरी, जिल्हाध्यक्ष डी.व्ही. राजे, प्रा.किरण सोनटक्के, रवि लोहट, सुशील वाघमोडे, सिद्धेश्वर मुंडे, प्रवीण सोनटक्के, हनुमान गलांडे, विश्वंभर देवडे आदींसह कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन