परभणी : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:53 IST2019-05-26T23:53:00+5:302019-05-26T23:53:29+5:30
सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सात जणांविरूद्ध पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे़

परभणी : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सात जणांविरूद्ध पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे़
या संदर्भात मयत मुलीचे वडील देवीदास मारोतीआप्पा काजळकर यांनी पालम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी मुलगी वैशाली हिचा विवाह पालम येथील शिवसांभ बाबुराव लांडगे यांच्याशी १७ मे २०१४ रोजी झाला होता़ लग्नानंतर घरातील सर्वच मंडळी मुलीला शारीरिक व मानसिक त्रास देत होते़ या त्रासाला कंटाळून २२ मे रोजी मुलीने आत्महत्या केली़ या तक्रारीवरून शिवसांभ लांडगे, बाबुराव लांडगे, पार्वतीबाई लांडगे, छाया लांडगे, महालिंग लांडगे, सरोजा लांडगे, आदिनाथ लांडगे या सात जणांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़