शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

परभणी : आचारसंहिता पथकाचे धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:17 AM

जिंतूर विधानसभा मतदारसंघात मतदान तीन दिवसांवर येऊन ठेपले असून प्रचार शिगेला पोहचला असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी १७ आॅक्टोबर रोजी रात्री राजकीय पक्षांच्या जेवणावळी आणि विना परवानगी चालणाऱ्या कला केंद्रावर छापे टाकले. तसेच अवैध दारुही जप्त केली आहे.

परभणी : आचारसंहिता पथकाचे धाडसत्रलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जिंतूर विधानसभा मतदारसंघात मतदान तीन दिवसांवर येऊन ठेपले असून प्रचार शिगेला पोहचला असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी १७ आॅक्टोबर रोजी रात्री राजकीय पक्षांच्या जेवणावळी आणि विना परवानगी चालणाऱ्या कला केंद्रावर छापे टाकले. तसेच अवैध दारुही जप्त केली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी हे गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जिंतूर येथून सेलूकडे येत असताना चिकलठाणा बु. शिवारातील एका शेतात राजकीय पक्षाकडून मतदारांना बेकायदेशीरपणे जेवणावळ दिली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पारधी यांनी घटनास्थळी जावून छापा टाकला. त्यामुळे जेवणासाठी आलेले मतदार ताट सोडून पळाले. या प्रकरणी आचारसंहिता विभागप्रमुख विष्णू मोरे यांच्या तक्रारीवरुन ३ प्रमुख कार्यकर्त्यांसह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.पाथरीच्या पाच जणांवर कारवाई : हद्दपार करण्याचे आदेश४परभणी : वेगवेगळे गुन्हे करुन दहशत निर्माण करणाºया पाथरी येथील पाच जणांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले आहेत. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पाथरी येथील सचिन लक्ष्मण कांबळे याच्यासह लक्ष्मण कचरुबा कांबळे, परमेश्वर उर्फ प्रमोद सुदाम कांबळे, रामेश्वर विश्वनाथ कांबळे, सुरेश रंगनाथ कांबळे यांच्या टोळीने पाथरी शहर व परिसरात अनेक गुन्हे घडवून उच्छाद मांडला होता.४अवैध जुगार चालविणे, अवैध दारू विक्री करणे, सिलिंग जमिनीच्या व्यवहारात स्वत:चा काहीही संबंध नसताना दखल देऊन स्वत:ला अनुकूल व्यवहार घडत नसल्यास असे व्यवहार थांबविण्यासाठी दंगा करणे, त्यासाठी वेळप्रसंगी खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्हे त्यांच्याविरुद्ध दाखल आहेत. या टोळीमुळे पाथरी शहर व परिसरात दहशत निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होत होती.४पाथरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी.डी. शिंदे यांनी या टोळीने नजीकच्या काळात घडविलेले गुन्हे आणि त्यांच्याविरुद्ध असलेल्या अभिलेख यांची पडताळणी करुन त्यांच्याविरुद्ध महाराष्टÑ पोलीस कायद्याप्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे पाठविला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांनी या प्रस्तावाची प्राथमिक चौकशी करुन हद्दपारीची शिफारस केली होती.४१८ आॅक्टोबर रोजी या प्रस्तावाची सुनावणी पूर्ण झाली असून, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी टोळीप्रमुख सचिन लक्ष्मण कांबळे, सदस्य परमेश्वर उर्फ प्रमोद सुदाम कांबळे आणि रामेश्वर विश्वनाथ कांबळे यांना सहा महिन्यासाठी तर टोळी सदस्य लक्ष्मण कचरुबा कांबळे आणि सुरेश रंगनाथ कांबळे यांना तीन महिन्यासाठी पाथरी तालुका व त्यालगतच्या सेलू, सोनपेठ, मानवत तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.डान्सिंग पार्टीतील चौघांवर कारवाई४जिंतूर-सेलू रस्त्यावर सेलू शहराजवळ विनापरवाना सुरु असलेल्या कला केंद्रावर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी १७ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता धाड टाकली. यावेळी कला केंद्रात नृत्यांगणावर पैसे उधळणाºया चार ग्राहकांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. चारही ग्राहकांना शुक्रवारी न्यायालयाने २४०० रुपये दंड सुनावल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीपान शेळके यांनी दिली.४ तसेच स्थानिक पोलिसांनी जवळा शिवारातील एका नाल्यामध्ये शुक्रवारी सकाळी देशी दारुचे १६ बॉक्स जप्त केले आहेत. या दारुची किंमत ३९ हजार ९३६ रुपये एवढी आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस