परभणी : रस्त्याच्या डांबरीकरणासाठी नागरिकांनी केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:27 IST2019-11-24T00:27:31+5:302019-11-24T00:27:52+5:30
उघडा महादेव ते कारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी या भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.

परभणी : रस्त्याच्या डांबरीकरणासाठी नागरिकांनी केले आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : उघडा महादेव ते कारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी या भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
परभणी शहरातील उघडा महादेव ते कारेगाव रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. उघडा महादेव ते कारेगाव रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे़ रचना नगर, कपिल नगर, गोकुळ नगर, संघमित्र कॉलनी, सहारा कॉलनी, प्रियदर्शनी नगर, एमआयडीसी, कामगार वसाहत, अहिल्याबाई नगर, आंबेडकर चौक, ओयासिस माध्यमिक शाळा आदी वसाहती आणि शाळा आहेत़ त्यामुळे दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून वाहतूक करतात़ मात्र रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचले आहे़ त्याचा त्रास वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे़ अनेक वेळा सायकलवरून पडून विद्यार्थी जखमी झाले आहेत़
या संदर्भात महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतरही गांभिर्याने घेतले जात नाही़ याशिवाय सांडपाण्याची व्यवस्था, नाल्या, दिवाबत्ती, जलवाहिनी, स्वच्छता अशा अनेक समस्या निर्माण झाल्याने येथील नागरिकांनी २३ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानुसार शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या आंदोलनास सुरुवात झाली. या भागातील अनेक नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवत रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली.