परभणी: खानापूर नगर येथे ट्रकखाली चिरडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:24 IST2019-04-16T23:24:03+5:302019-04-16T23:24:28+5:30
ट्रकखाली चिरडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील खानापूर नगर भागात १६ एप्रिल रोजी सकाळी ९़१५ वाजेच्या सुमारास घडली़

परभणी: खानापूर नगर येथे ट्रकखाली चिरडून बालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ट्रकखाली चिरडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील खानापूर नगर भागात १६ एप्रिल रोजी सकाळी ९़१५ वाजेच्या सुमारास घडली़
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, खानापूर नगर ते पिंगळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रोहन राजेभाऊ मोरे हा आठ वर्षांचा मुलगा सायकल खेळत होता़ याचवेळी एमएच १४ एफ १८०३ या क्रमांकाचा टेम्पो पाठीमागे घेत असताना चालकाला पाठीमागे असलेल्या सायकलस्वार बालक लक्षात आला नाही आणि टेम्पोच्या पाठीमागील चाकामध्ये सापडून रोहन राजाभाऊ मोरे हा गंभीर जखमी झाला़ त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला़ घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धावपळ करीत तातडीने रोहन मोरे यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी रोहन मोरे यास मृत घोषित केले़
दरम्यान, या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जा आहे़ या प्रकरणी रविकुमार माने यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, टेम्पो चालक शेख अतिफ शेख लतिफ याने निष्काळजीपणे टेम्पो चालविल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ त्यावरून शेख अतिफ याच्याविरूद्ध नवा मोंढ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले तपास करीत आहेत़