परभणी : केक भरवून साजरा केला ब्रुनो श्वानाचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:18 IST2020-02-20T00:17:14+5:302020-02-20T00:18:09+5:30
जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान ब्रुनो याचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या श्वानाला पुष्पहार घालून व केक भरवून पथकातील कर्मचाऱ्यांनी श्वानाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

परभणी : केक भरवून साजरा केला ब्रुनो श्वानाचा वाढदिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान ब्रुनो याचा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या श्वानाला पुष्पहार घालून व केक भरवून पथकातील कर्मचाऱ्यांनी श्वानाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
पोलीस दलातील बॉम्ब शोधक व अपराध शोधक पथकामध्ये २८ मार्च २०१७ रोजी ब्रुनो नावाचा श्वान दाखल झाला आहे. बॉम्ब शोधण्यामध्ये पटाईत असलेल्या या श्वानाचा जन्म १८ फेब्रुवारी २०१७ रोजी झाला आहे. श्वानाचे प्रथम हस्तक लखनसिंह ठाकूर हे असून दुय्यम हस्तक म्हणून मनोहर लोखंडे हे काम पाहतात.
१८ फेब्रुवारी रोजी ब्रुनो या श्वानाचा तिसरा वाढदिवस असल्याने या दिवशी श्वानाला पूर्ण विश्रांती देण्यात आली. तसेच अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी श्वान पथकातील जॉनी, पंच, रियो, ओरियन या श्वानांसह पोलीस उपनिरीक्षक किशोर नाईक, कर्मचारी मनोहर लोखंडे, प्रेमदास राठोड, साहेब तोटेवाड, अमोल सिरसकर, सीता वाघमारे, रामचंद्र जाधव, मारोती बुधवारे, शेख शाकीर, मो. इनामदार आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे मागील वर्षीही या श्वानाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. हीच परंपरा राखत बॉम्ब शोधक पथकातील अधिकारी, कर्मचाºयांनी ब्रुनोचा तिसरा वाढदिवसही साजरा केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची पोलीस दलात दिवसभर चर्चा होती.