परभणीत सराफा दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:08 IST2017-12-02T01:08:20+5:302017-12-02T01:08:36+5:30
शहरातील विद्यानगर भागातील एक सराफा दुकान फोडून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीत सराफा दुकान फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील विद्यानगर भागातील एक सराफा दुकान फोडून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यानगर भागात डॉ.केंद्रेकर रुग्णालयाच्या बाजुला श्रीनिवास सुरेशराव डहाळे यांचे सराफा दुकान आहे. ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडले व शटर वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील गल्ल्यात ठेवलेले दोन हजार रुपये आणि कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे ३३ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही बाब शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास डहाळे यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार बाबासाहेब लोखंडे करीत आहेत.