Parbhani: Book of Saibaba's book | परभणी : साईबाबांवरील पुस्तकाचे प्रकाशन
परभणी : साईबाबांवरील पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील पाथरी येथील साई जन्मभूमीच्या अनुषंगाने येथील ज्येष्ठ पत्रकार शरद देऊळगावकर यांनी साईबाबांवर लिहिलेल्या ‘साईबाबा- शोध आणि बोध’ या लेख संग्रहाचे प्रकाशन नुकतेच औरंगाबाद येथे झाले़
पाथरी येथील साई मंदिरातील कीर्तनकार माधवबुवा आजेगावकर यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला़ यावेळी सेवानिवृत्त न्या़ शशिकांतराव कुलकर्णी, साई संस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष सीताराम धानू, विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि साईबाबा घराण्याचे वंशज संजय भुसारी यांची प्रमुख उपस्थिती होती़ लहानपणापासूनच साईबाबांच्या जन्मभूमीविषयी आकर्षण होते़ या जन्मभूमीविषयी सदोहरण भूमिका या पुस्तकामध्ये मांडली आहे, असे लेखक शरद देऊळगावकर यांनी सांगितले़ यावेळी साई संस्थानच्या वतीने अध्यक्ष धानू यांनी देऊळगावकर यांचा सत्कार केला़


Web Title: Parbhani: Book of Saibaba's book
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.