परभणी : पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:17 IST2018-02-19T00:17:07+5:302018-02-19T00:17:17+5:30
येथील वसमत मार्गावरील पूर्णा नदीच्या पात्रामध्ये राहटी पुलाजवळ एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह १७ फेब्रुवारी रोजी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

परभणी : पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसमत मार्गावरील पूर्णा नदीच्या पात्रामध्ये राहटी पुलाजवळ एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह १७ फेब्रुवारी रोजी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
पूर्णा नदीच्या पात्रामध्ये राहटी पुलाजवळ एका पोत्यात प्रेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ यावरून पोलिसांनी राहटी पुलाजवळ जाऊन पाहणी केली असता, नदीच्या पात्रामध्ये एका पोत्यात ३८ वर्षीय व्यक्तीचे प्रेत आढळून आले़
अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी ए़जी़ खान, पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ मयत व्यक्तीच्या अंगावर चॉकलेटी रंगाचे शर्ट असून, निळ्या रंगाची जिन्स पँट आहे़ तसेच उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये पिवळ्या धातूची लाल खडा असलेली अंगठी आहे़ शिवाय उजव्या हाताच्या पंजावर इंग्रजीमधील एस गोंदलेले आहे़
या प्रकरणी पोलीस हवालदार विनोद रत्ने यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे़
पोलीस निरीक्षक ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे तपास करीत आहेत़