परभणीत भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम : तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:39 AM2019-09-05T00:39:22+5:302019-09-05T00:40:27+5:30

तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़ भीमराज की बेटी हूं, मै तो जयभीमवाली हूं़़़ मी वादळ वारा यासारख्या एकापेक्षा एक सरस भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम मंगळवारी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़

Parbhani Bhimaghata Bahadur program: You need Bhimarao in your blood | परभणीत भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम : तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़

परभणीत भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम : तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे़़़ भीमराज की बेटी हूं, मै तो जयभीमवाली हूं़़़ मी वादळ वारा यासारख्या एकापेक्षा एक सरस भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम मंगळवारी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती़
परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या भीमगीत संगीत रजनी कार्यक्रमाचे उद्घाटन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या हस्ते झाले़ यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ़ विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षा सिद्धार्थ हत्तीअंबिरे, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, नगरसेवक चंदू शिंदे, प्रशास ठाकूर, राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल पाथरीकर, काँग्रेसचे सभापती नागेश सोनपसारे, विकास लंगोटे, ज्ञानेश्वर पवार, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड, बाळासाहेब गोडबोले आदींची उपस्थिती होती़ यावेळी प्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी, गायिका वैशाली माडे, अनिरुद्ध बनकर यांच्या संचाने बहारदार भीमगीते सादर केली़ यावेळी उपस्थितांनी जोरदार जल्लोष केला़ सूत्रसंचालन एऩ आऱ सरोदे यांनी केले तर आभार नगरसेवक सुशील कांबळे यांनी मानले़

Web Title: Parbhani Bhimaghata Bahadur program: You need Bhimarao in your blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.