परभणी: बोबडे टाकळी येथे वीज कर्मचाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:41 IST2019-10-09T23:41:38+5:302019-10-09T23:41:55+5:30
तालुक्यातील बोबडे टाकळी येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी रात्री १०़४५ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद झाला आहे़

परभणी: बोबडे टाकळी येथे वीज कर्मचाऱ्यास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील बोबडे टाकळी येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी रात्री १०़४५ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद झाला आहे़
महावितरण कंपनीचे बोबडे टाकळी येथील यंत्र चालक तेजस रामदास मसारे यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ त्यात म्हटले आहे की, ८ आॅक्टोबर रोजी रात्री १०़४५ वाजेच्या सुमारास मौजे पिंगळी कोथाळा येथील वीज वाहिनीत बिघाड झाल्याने उपकेंद्राची लाईन चालू बंद करून हा बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी मदन बन्सीधर बोबडे, तातेराव उर्फ चिलू बोबडे, विलास शिवाजीराव बोबडे आणि जनार्दन त्र्यंबक बोबडे यांनी वाद घातला़ आमच्या गावची लाईट नेहमीच बंद करतात़ आम्हाला लाईट पाहिजे नाही, असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या, अशी तक्रार दिली आहे़ त्यावरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चारही आरोपीविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे़ उपनिरीक्षक उद्धव सावंत हे तपास करीत आहेत़