परभणी: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाकडे बँकांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:25 IST2019-06-25T00:25:08+5:302019-06-25T00:25:19+5:30
तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

परभणी: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाकडे बँकांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पालम शहरात राष्ट्रीयकृत बँकांच्या दोन व ग्रामीण भागामध्ये २ शाखा कार्यरत आहेत. यामधून दरवर्षी शेतकºयांना नेहमीच कर्ज देताना हात आखडता घेतला जात आहे. मागील वर्षी तर उन्हाळ्यात राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज देऊन प्रताप केला होता.
खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकºयांना पेरणीपूर्वक पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. प्रस्ताव दाखल करूनही अधिकाºयांकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. तसेच शेतकºयांना पीक कर्ज मागण्यासाठी गेले असता तुच्छतेची वागणूक दिली जात आहे.
खरीप हंगामाची लगबग सुरू होऊनही बँकांनी मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसून शेतकºयांना कर्ज देण्याकडे पाठ फिरवलेली आहे. वेळेवर कर्ज दिले जात नसल्याने शेतकºयांना खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत असून मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे.
पाऊस पडताच पेरणी करावी लागत असल्याने शेतकºयांनी अगोदरच बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केलेली आहे.
पेरणी झाल्यानंतर बँकाचे पीककर्ज घेऊन काय उपयोग? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे. दरवर्षीच पीक कर्ज देताना बँक वेळेचे बंधन न पाळता मनमानी पद्धतीने पीककर्ज वाटप करीत असल्याने पालम तालुक्यातील शेतकºयांना पीक कर्जाचा फारसा उपयोग होत नाही.