शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

परभणी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेस जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:49 AM

अनैतिक संबंधावरून पतीने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २ जानेवारी रोजी परभणी-जिंतूर रस्त्यावरील साई खानावळीच्या बाजुला घडली़ घटनेनंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होवून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): अनैतिक संबंधावरून पतीने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २ जानेवारी रोजी परभणी-जिंतूर रस्त्यावरील साई खानावळीच्या बाजुला घडली़ घटनेनंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होवून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली़जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सपना गवळी यांचा विवाह औरंगाबाद येथील संतोष नागोराव कांबळे या युवकाशी १५ मे २०१९ रोजी झाला होता़ तेव्हापासून पत्नीचे संबंध इतरांसोबत असल्याचे संतोष कांबळे याला वाटत होते़ या संशयातून २ जानेवारी रोजी संतोष कांबळे हा सासरवाडीत पत्नीला भेटण्यासाठी गेला़ सासरवाडीत जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी जात आहोत, असे म्हणत पत्नीला सोबत घेवून परभणी-जिंतूर या रस्त्यावरील साई खानावळ परिसरात आला़ या ठिकाणी एका शेतात नेवून पत्नीला मारहाण करून डोक्यात दगड घातला़ त्यानंतर पत्नी ठार झाल्याचे समजून स्वत: बोरी पोलीस ठाण्यात हजर झाला़ त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना आपण पत्नीचा खून केल्याची कबुली दिली़ त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धावू घेवून सपना गवळी यांची पाहणी केली असता त्या जिवंत असल्याचे दिसून आले़ त्यानंतर सपना यांना तत्काळ नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले़ या घटनेमुळे बोरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ सपना यांचे वडिल दत्तराव गवळी यांच्या फिर्यादीवरून संतोष नागोराव कांबळे (रा़ औरंगाबाद) याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास बोरी पोलीस ठाण्याचे सुभाषचंद्र मार्कंड, व्ही़एम़ गिरी हे करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी