परभणी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेस जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:49 AM2020-01-04T00:49:53+5:302020-01-04T00:50:23+5:30

अनैतिक संबंधावरून पतीने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २ जानेवारी रोजी परभणी-जिंतूर रस्त्यावरील साई खानावळीच्या बाजुला घडली़ घटनेनंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होवून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली़

Parbhani: An attempt to kill a woman on suspicion of immoral sex | परभणी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेस जिवे मारण्याचा प्रयत्न

परभणी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेस जिवे मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): अनैतिक संबंधावरून पतीने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २ जानेवारी रोजी परभणी-जिंतूर रस्त्यावरील साई खानावळीच्या बाजुला घडली़ घटनेनंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होवून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली़
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सपना गवळी यांचा विवाह औरंगाबाद येथील संतोष नागोराव कांबळे या युवकाशी १५ मे २०१९ रोजी झाला होता़ तेव्हापासून पत्नीचे संबंध इतरांसोबत असल्याचे संतोष कांबळे याला वाटत होते़ या संशयातून २ जानेवारी रोजी संतोष कांबळे हा सासरवाडीत पत्नीला भेटण्यासाठी गेला़ सासरवाडीत जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी जात आहोत, असे म्हणत पत्नीला सोबत घेवून परभणी-जिंतूर या रस्त्यावरील साई खानावळ परिसरात आला़ या ठिकाणी एका शेतात नेवून पत्नीला मारहाण करून डोक्यात दगड घातला़ त्यानंतर पत्नी ठार झाल्याचे समजून स्वत: बोरी पोलीस ठाण्यात हजर झाला़ त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना आपण पत्नीचा खून केल्याची कबुली दिली़ त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धावू घेवून सपना गवळी यांची पाहणी केली असता त्या जिवंत असल्याचे दिसून आले़ त्यानंतर सपना यांना तत्काळ नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले़ या घटनेमुळे बोरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ सपना यांचे वडिल दत्तराव गवळी यांच्या फिर्यादीवरून संतोष नागोराव कांबळे (रा़ औरंगाबाद) याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास बोरी पोलीस ठाण्याचे सुभाषचंद्र मार्कंड, व्ही़एम़ गिरी हे करीत आहेत़

Web Title: Parbhani: An attempt to kill a woman on suspicion of immoral sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.