शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

परभणी : घरावर पेट्रोल टाकणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:25 PM

तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल हल्ला करणाºया आरोपीला जिंंतूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल हल्ला करणाºया आरोपीला जिंंतूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रशांत मुळी व प्रवीण मुळी यांच्या घरावर २७ मे रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात या प्रकरणाशी संबंधित असणाºया अनिल देविदास वाकळे यास ताब्यात घेतले. या आरोपीला जिंतूर न्यायालयासमोर हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी अनेक चोºया केल्याने विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या अनुषंगाने अनिल वाकळे याने येलदरी येथील मारोती मंदिरातील साऊंड सिस्टीम चोरी केली होती. ही घटना प्रवीण मुळी यांनी उजेडात आणली होती. त्याच बरोबर यापूर्वीही येलदरी येथील एका मोठ्या चोरीच्या प्रकरणात मुळी यांना इतंभूत माहिती असल्याने त्याचा बदला म्हणून संबंधिताने हे कृत्य केले असावे, असा अंदाज आहे. तसेच मुळी यांच्या घरी ३ जून रोजी मागच्या दाराने पुन्हा दगडफेक झाली. दगडफेक करीत असताना आरोपीने अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले होते. मात्र काही व्यक्तींनी अनिल वाकळे हा रात्रीच्या वेळी घरी जाताना पाहिले होेते. त्यानंतर मुळी यांचा संशय पक्का झाला. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला. नेमका आरोपी कोण? हे पोलिसांना माहितीच नव्हते. म्हणून पोलिसांनी आरोपीलाच अनिल वाकळे कुठे राहतो? याची विचारपूस केली. त्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी गावातील एका महिलेला आरोपीची माहिती विचारली. तेव्हा तुमच्या सोबत असलेलाच अनिल वाकळे हा आरोपी आहे, असे म्हणताच पोलिसही भांबावले. तोपर्यंत अनिल वाकळे हा गावापासून सेनगाव तालुक्यातील साखरा गावाच्या दिशेने २० कि.मी. दूर गेला होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत त्यास पकडले. ४ जून रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एल.शेख, पोलीस शिपाई पी.एस. तूपसुंदर, राजेश सरोदे, व्यंकटेश नरवाडे आदींनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPetrolपेट्रोल