शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

परभणी : जाळ्यात अडकलेल्या अजगरास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:34 IST

पूर्णा तालुक्यातील खडकी येथील नदीपात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या ७ फुटी लांबीच्या अजगराला परभणीतील सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील खडकी येथील नदीपात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या ७ फुटी लांबीच्या अजगराला परभणीतील सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.खडकी नदीपत्रामाध्ये एका जाळ्यात अजगर अडकला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी येथील शेतकरी गोपाळ पवार यांना मिळाली. त्यानंतर गावातील काही तरुणांनी काठीच्या सहाय्याने या अजगराला जाळ्यातून मुक्त करण्याचा प्रयत्नही केला; परंतु, त्यांना यश आले नाही. उलट तो अधिकच त्या जाळ्यात गुंतत गेला. निवृत्ती पवार, तुकाराम खुणे, हरिश पोपळघट यांनी ही माहिती परभणी येथील सर्पमित्र रणजित कारेगावकर यांना दिली. त्यानंतर २० डिसेंबर रोजी रणजित कारेगावकर यांच्यासह ज्ञानेश डाके, दीपक घाटूळ, प्रसाद ठाकूर हे वझूर येथे पोहोचले. तेव्हा नदीपात्रात अजगराच्या तोंडाचा पूर्ण भाग जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत होता. गावातून कात्री व ब्लेड मागविण्यात आल्या. ज्ञानेश डाके, रणजित कारेगावकर यांनी जाळे कापण्यास सुरुवात केली. दीपक घाटूळ व प्रसाद ठाकूर यांनी तडफडणाऱ्या अजगरास पकडून ठेवले. एक तासाच्या प्रयत्नानंतर या अजगराला जाळ्यातून मुक्त करण्यात यश आले. पकडलेला अजगर निर्जनस्थळी सोडून देण्यात आला. याकामी विकास पवार, शिवाजी पवार, बालासाहेब पवार, दिलीप पवार, देवानंद कचरे, माणिक पवार, नानासाहेब पवार, सूर्यकांत पवार, शरद अंभुरे आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :parabhaniपरभणीsnakeसापriverनदी