शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

परभणी : १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:03 AM

मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असला तरी जिल्हा प्रशासनाने वृक्ष लागवड मोहिमेची तयारी सुरू केली असून, यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात १ कोटी २० लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़

परभणी : १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्टलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असला तरी जिल्हा प्रशासनाने वृक्ष लागवड मोहिमेची तयारी सुरू केली असून, यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात १ कोटी २० लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़दरवर्षी पावसाळ्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते़ जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जाते़ यावर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जिल्हा प्रशासन वृक्ष लागवडीच्या मोहिमेत गुंतले आहे़ सामाजिक वनीकरण विभाग आणि वन विभागावर वृक्ष लागवडीची प्रमुख जबाबदारी असून, जिल्हा प्रशासनातील इतर शासकीय कार्यालयांना वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे़ दरवर्षी १ जुलै रोजी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली जाते़ जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात वृक्षारोपण करण्यात येते़ परंतु, यापैकी अनेक झाडे जगत नाहीत़ हा आजवरचा अनुभव आहे़ यावर्षीही लावलेल्या झाडांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ प्रशासनाच्या वृक्ष लागवड मोहीमेमध्ये लोकांचा सहभाग वाढविला जाणार असून, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती केली जाणार आहे़ तसेच शासकीय यंत्रणांवर शासनाच्या मंत्रालयातून आॅनलाईन नियंत्रण ठेवले जाणार आहे़ प्रत्येक शासकीय कार्यालयाने वृक्ष लागवडीसाठी खड्ड्यांचे खोदकाम केल्यापासून ते वृक्ष लावगड केल्यापर्यंतचा फोटो आॅनलाईन महाफॉरेस्ट या संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे़ विशेष म्हणजे, झाडांचे व्हिडीओ देखील अपलोड करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे यावर्षी ही मोहीम विशेष ठरणार असून, या मोहिमेंतर्गत लावलेली किती झाडे जगतात? याकडे लक्ष लागले आहे़रेल्वे विभागाची उदासिनतावृक्ष लागवड मोहिमेसाठी राज्य शासनाच्या अखत्यारित असलेले शासकीय विभाग प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रेल्वे विभाग मात्र उदासिन असल्याचे दिसून येत आहे़ मागील वर्षी या विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते़; परंतु, रेल्वे विभागाने एकही झाड लावले नाही़ आता यावर्षी देखील या विभागाला १२५० झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून रेल्वे विभागाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे़विभागांना दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्टच्राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे़ त्यामध्ये महसूल विभागाला २९ हजार ४५०, पशू संवर्धन विभागाला ९ हजार २५०, महानगरपालिकेला २ हजार ५००, नगरपालिका प्रशासनाला २५ हजार १२०, सामान्य प्रशासन विभागाला १० हजार ५००, निवासी उपजिल्हाधिकारी विभागास १८००, परिवहन विभागास १८५०, उद्योग विभागाला १५ हजार ७५०, गृह विभागास ८ हजार ७००, जिल्हा कारागृह परिसर ५ हजार, उर्जा विभाग ८ हजार ७५०, सार्वजनिक आरोग्य विभाग २९ हजार ८५०, जिल्हा शल्यचिकित्सक ३ हजार ६००, सार्वजनिक बांधकाम विभाग ७० हजार, जिल्हा परिषद १२ लाख ९७ हजार ९८०, ग्रामपंचायत परिसर २२ लाख ५३ हजार ५००, जलसंधारण विभाग १० हजार, शालेय शिक्षण विभाग ३ लाख ४८ हजार २५०, सामाजिक न्याय विभाग १२ हजार २००, जलसंधारण विभाग ५१ हजार ७५०, कृषी विभाग ६ लाख ६६ हजार ३५०, वन विभाग ४२ लाख २२ हजार, रेशीम उद्योग विभाग १ लाख ५० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़नेमगिरीत उभारले मॉडेलच्वृक्षारोपण केल्यानंतर ती झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चित झाडे जगतात़ वन विभागाने नेमरिगीच्या डोंगरावर दगड कोरून झाडे लावली होती़च्सुरुवातीला दोन-तीन फुटापर्यंत असलेली ही झाडे ८ ते १० फुटापर्यंत वाढली आहेत़ या भागातील लोकांचेही या कामी सहकार्य लाभले़च्त्यामुळे नेमगिरीतील मॉडेल जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल, अशी माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली़यावर्षी तीन महिने चालणार मोहीमच्दरवर्षी जुलै महिन्यातच वृक्ष लागवड मोहीम राबविली जात होती़ यावर्षी मात्र या मोहिमेचा कालावधी वाढविण्यात आला आहे़ वृक्ष लागवडीची संख्या अधिक असल्याने १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत मोहीम राबविली जाणार आहे़ १ जुलै रोजी पुरेसा पाऊस झाला नाही तर प्रतिकात्मक पद्धतीने उद्घाटन करून ही मोहीम सुरू केली जाणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसrailwayरेल्वे