शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

परभणी : मातंग समाजासाठी ७१४ घरकुलांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:32 PM

रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मातंग समाज बांधवांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला ७१४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून याला राज्याच्या समाजकल्याण विभागाने १४ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मातंग समाज बांधवांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला ७१४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून याला राज्याच्या समाजकल्याण विभागाने १४ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने रमाई आवास योजना ग्रामीण व शहरी भागासाठी राबविण्यात येते. आतापर्यंत ही योजना अनुसूचित जाती नवबौद्ध संवर्गासाठी राबविण्यात येत होती. आता मातंग समाज बांधवांसाठीही ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार मातंग समाजाच्या लोकसंख्येची जिल्हानिहाय टक्केवारी विचारात घेऊन घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्याला ७१४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.या उद्दिष्टास १४ जानेवारी रोजी सामाजिक न्याय विभागाने आदेश काढून मंजुरी दिली आहे. २०१८-१९ या या आर्थिक वर्षासाठी हे उद्दिष्ट असले तरी आर्थिक वर्ष संपण्यास फक्त अडीच महिन्यांचा कालवधी राहिला आहे.या कालावधीत घरकुल बांधकामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरुन या योजनेला गतीमानता आणण्यासाठी यंत्रणेला कामाला लागावे लागणार आहे.नांदेडमध्ये सर्वाधिक घरकुले४सामाजिक न्याय विभागाने ग्रामीण भागातील मातंग समाज बांधवांसाठी रमाई आवास योजनेंतर्गत मंजूर केलेल्या उद्दिष्टात मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ३ हजार ५३ घरकुलांचे नांदेड जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्या खालोखाल लातूर जिल्ह्याला २ हजार ५५२, हिंगोली जिल्ह्याला १ हजार ६९०, बीड जिल्ह्याला १ हजार ४७७, उस्मानाबाद जिल्ह्याला १ हजार ४९, जालना जिल्ह्याला १ हजार ६४, औरंगाबाद जिल्ह्याला ९३८ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.मनपाची साडेसातशे प्रस्तावांना मंजुरी४रमाई आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेने ७५६ प्रस्तावांना १४ जानवरी रोजी मान्यता दिली असून, या प्रस्तावांची यादी रमाई आवास योजनेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महानगरपालिकेला १८०० लाभार्थ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. शहराच्या हद्दीत यापूर्वी आॅगस्ट महिन्यात ३६५, आॅक्टोबर महिन्यात ४९५ प्रस्तावांना मंजुरी दिली होती. आता ७५६ प्रस्तावांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे उद्दीष्टाच्या तुलनेत १६१३ प्रस्तावांना मनपाने मंजुरी दिली असून, त्यापैकी ३६२ घरकुलांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मनपाने दिली. दरम्यान, मनपाचे समाजकल्याण सभापती नागेश सोनपसारे, आयुक्त रमेश पवार, रमाई आवास विभाग प्रमुख सुभाष मस्के, अभियंता पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मंजूर झालेल्या प्रस्तावांवर १७ ते २३ जानेवारी या काळात आक्षेप स्वीकारले जाणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारHomeघर