परभणी : आॅईल मिलला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:37 IST2018-10-17T23:36:40+5:302018-10-17T23:37:34+5:30
येथील औंढा रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील वैभव आॅईल मिलला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

परभणी : आॅईल मिलला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : येथील औंढा रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील वैभव आॅईल मिलला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
वैभव वट्टमवार यांच्या मालकीच्या वैभव आॅईल मिलमध्ये बारदाना ठेवला होता. बुधवारी सकाळी आॅईल मिलला आग लागली. त्यात बारदाना जळून खाक झाला आहे. याबाबत माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे मिर्झा मुजाहेद बेग, चतरू राठोड यांच्यासह आॅईल मिलमधील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. तोपर्यंत बारदाना जळून खाक झाला होता. या आगीत सुमारे १२ लाख रुपयांचा बारदाना जळून खाक झाला असल्याची माहिती सुभाष वट्टमवार यांनी दिली.