शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

परभणी : १२८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:09 AM

जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना आधार मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकºयांना आधार मिळाला आहे.मागील वर्षी जिल्ह्यात ७१ टक्के पाऊस झाला. परतीचा पाऊस न झाल्याने संपूर्ण रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी काढल्यानंतर सहा तालुक्यांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी निघाली. परिणामी हे तालुके शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट झाले. परभणीसह पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ आणि सेलू तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने पहिल्या टप्प्यात हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले.या तालुक्यातील शेतकºयांना दुष्काळापोटी शासनाने दुष्काळ अनुदान जाहीर केले होते. महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४७९ गावांमधील २ लाख ६४ हजार ३६ शेतकºयांसाठी १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले होते.दोन टप्प्यात हे अनुदान जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाकडून तालुकानिहाय तहसील कार्यालयांना अनुदानाचे वितरण करण्यात आले. तहसीलस्तरावरुन पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करुन हे अनुदान बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७१ टक्के निधी बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. उर्वरित निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दुष्काळी स्थितीमध्ये अनुदान जमा होत असल्याने शेतकºयांना आर्थिक आधार झाला आहे.सोनपेठ तालुक्यात ९९ टक्के वाटप पूर्ण४सोनपेठ तालुक्यातील ६० गावांमधील ३० हजार २१३ शेतकºयांसाठी २० कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. तहसील प्रशासनाने २७ हजार ५७५ शेतकºयांच्या खात्यावर २० कोटी ३१ लाख ६९ हजार रुपये जमा केले असून वाटपाची ही टक्केवारी ९९.८६ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाटप सोनपेठ तालुक्यामध्ये झाले आहे. पालम तालुक्यातील ८२ गावांमधील २४ हजार ६५६ शेतकºयांसाठी २२ कोटी ५४ लाख ७२ हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. या तालुक्यात २२ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा झाला आहे. तसेच पाथरी तालुक्यामध्ये २४ कोटी ४१ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. ४१ हजार ४१७ शेतकºयांपैकी ३५ हजार ८७० शेतकºयांच्या खात्यावर २३ कोटी ४८ लाख ८१ हजार वितरित करण्यात आले. सेलू तालुक्यामध्ये ५१ हजार ६४१ लाभार्थी शेतकºयांसाठी ३५ कोटी ३३ लाख ५८ हजार रुपये प्राप्त झाले होते. या तालुक्यातील ४८ हजार ५३७ शेतकºयांच्या बँक खात्यावर २५ कोटी ६ लाख ९३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मानवत तालुक्यामध्ये ३२ हजार २६६ शेतकºयांच्या खात्यावर १३ कोटी ६९ लाख ४५ हजार रुपये आणि परभणी तालुक्यातील ५६ हजार ५३८ शेतकºयांच्या खात्यावर २३ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये जमा केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.४६० गावांच्या याद्या तयार४जिल्ह्यातील ४७९ दुष्काळग्रस्त गावांपैकी ४६० गावांमधील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये परभणी तालुक्यातील १३१ पैकी १२० गावातील शेतकºयांच्या याद्या तयार झाल्या आहेत.४ तसेच पालम तालुक्यातील ८२ पैकी ७७, पाथरी ५८ पैकी १, मानवत ५४ पैकी ५३, सोनपेठ ६० पैकी ६० आणि सेलू तालुक्यातील ९४ गावांमधील शेतकºयांच्या याद्या बँक खाते क्रमांकासह तयार करण्यात आल्या आहेत.आणखी २५ कोटींची आवश्यकतादुष्काळग्रस्त तालुक्यामधील शेतकºयांना राज्य शासनाने अनुदान जाहीर केले आहे. २ हेक्टरपर्यंत जिरायती शेती असणाºया शेतकºयांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये आणि फळ पिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकºयांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यासाठी प्रशासनाला आणखी २५ ते ३० कोटी रुपयांची आवश्यकता लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दृष्टीने माहिती संकलित केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक