परभणी : पहिल्या दिवशी ८४९ विद्यार्थी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:16 IST2019-03-02T00:16:13+5:302019-03-02T00:16:41+5:30
जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी ८४९ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर असल्याचे आढळून आले आहे

परभणी : पहिल्या दिवशी ८४९ विद्यार्थी गैरहजर
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी ८४९ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर असल्याचे आढळून आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर या परीक्षा सुरु आहेत.
पहिल्या दिवशी प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू या विषयासाठी २९ हजार १४५ विद्यार्थ्यांपैकी २८ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ८४९ विद्यार्थी गैरहजर होते. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील माऊली ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात कॉपी करताना एक विद्यार्थी आढळून आला. या विद्यार्थ्यावर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या वतीने ९४ केंद्रावर ९४ बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ३३ भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था व्यवस्थित नव्हती.